शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 06:38 IST

आनंद परांजपे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्तांची भेट घेत ऋता आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ठाणे : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणारा अतिरेकी ओसामा बिन लादेन भारताचे राष्ट्रपती व शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखा का होऊ शकला नाही? आईच्या उदरातून ओसामा दहशतवादी म्हणून जन्माला आला नाही. समाजाने व आजूबाजूच्या परिस्थितीने त्याला दहशतवादी बनवले. त्याचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला. त्यामुळे मुस्लिम समाजाने  शिक्षित झाले पाहिजे, असे प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड यांनी केल्याचा व्हिडीओ सोशल व्हायरल झाला. 

आव्हाडांकडून खंडन 

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन लादेन व कलाम यांची तुलना केल्याबद्दल ऋता आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मुंब्रा कौसा येथे महिला व विद्यार्थिनींसाठी बुधवारी मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी ऋता यांनी लादेनचे आत्मचरित्र वाचण्याचा सल्ला दिला. 

दरम्यान आजची पिढी अभ्यास करत नसल्याने त्यांना दिग्गजांची चरित्रे वाचण्यास सांगितले. कोणाची तुलना केली नाही, असे ऋता आव्हाड यांनी सांगितले.  

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड