शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगाशी झुंज देत दिव्यानं १० वीच्या परीक्षेत मारली बाजी, मिळवले ८१ टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:14 IST

कर्करोगावर मात करत दिव्याने १०वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

ठाणे -  कर्करोगावर मात करत दिव्याने १०वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कोरोना महामारीत विद्यार्थ्यांना शाळेपासून दोन वर्षं मुकावे लागले. यात दिव्याचादेखील समावेश होता. या दरम्यानचा काळात दिव्याला दम लागणे सुक्या खोकल्याची लागण झाली. त्यामुळे पालकांनी दिव्याची कोरोनाची त्वरित तपासणी केली. परंतु ती या टेस्टमध्ये निगेटिव्ह आली. दिव्याच्या तब्येतीत सुधारणा होत नासण्याने डॉक्टरांनी सिटी स्कॅनचा सल्ला दिला. सिटी स्कॅन केले असता त्यात दिव्याला कर्करोग असण्याचा अंदाज व्यक्त केला.

या दरम्यान दिव्या आपल्या गावी वाकलवाडी पुणे येथे होती. तिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि तिला कर्करोग असल्याने निदर्शनास आले. पुढील उपचारासाठी दिव्याला टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिव्याला केमो थेअरिपीसाठी ठाणे ते परेल हा प्रवास ९ महिने करावा लागला. त्यात तिला १४ वेला रक्ताची गरज आणि १५ वेळा प्लेटलेट्स कमी पडल्याने  पांढऱ्या पेशींची गरज भासली. या कठीण काळात पालकांनी दिव्याला १०वी ची परीक्षा न देण्याचा सल्ला दिला परंतु दिव्याने परीक्षा देण्याचा हट्ट धरला आणि पालकांनी तिला परवानगी दिली. या परीक्षेच्या काळात दिव्याला शेवटचे तीन पेपर असताना नागीण या रोगाची लागण झाली. दिव्याचे कर्करोगावर अजूनही उपचार चालू आहेत. अशा कठीण परिस्थितीत देखील दिव्याच्या जिद्दीमुळे तिला घवघवीत यश मिळाले. तिनं या परीक्षेत ८१.६० टक्के गुण मिळवले.

टॅग्स :thaneठाणेssc examदहावी