शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, दहा पेक्षा अधिक गोदामं जळून खाक

By नितीन पंडित | Updated: May 12, 2023 18:41 IST

ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट सर्वदूर पसरले होते.

भिवंडी: तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी कंपाउंड येथील शहा वेअर हाऊस व देशमुख वेअर हाऊस या ज्वलनशील केमिकल साठविलेल्या गोदामांना शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट सर्वदूर पसरले होते. या आगीत सुमारे दहा ते बारा गोदाम जळून खाक झाली आहेत .

आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीची व्याप्ती पाहता कल्याण व ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्यांना बोलाविण्यात आले. परिसरातील स्थानिक नागरिकांनी खाजगी टँकर चालकांकडून पाणी उपलब्ध करून दिल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. केमिकल ड्रमचा स्फोट होऊन केमिकल ड्रम इतरत्र पडून गोदामांना आगी लागण्याचे सत्र सुरू आहे.

या आगीत नजीकच्या मोकळ्या मैदानात उभ्या केलेल्या दोन ट्रक जळून खाक झाल्या असून एका पाण्याच्या टँकर चालकाने प्रसंगावधान राखत तेथील केमिकलने भरलेला टँकर सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. आग अजून धुमसत असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाही. सुमारे पाच तास धुमसत असणारी ही आग पूर्ण विझण्यासाठी किमान दहा तासाहून अधिक अवधी लागेल अशी माहिती भिवंडी अग्निशामक दलाचे अधिकारी कमलाकर कनाते यांनी दिली आहे.

दरम्यान, या आगीचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही. विशेष म्हणजे ही आग बाजूच्या वाफेकर कंपाउंड येथील कच्चा झोपड्यांपर्यंत पोहचली होती. परंतु येथील झोपड्या रिकाम्या असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग