शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फी १०० रुपये, विद्यार्थी फक्त २०; परप्रांतीय शिक्षण संस्थेकडून शिक्षणाचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:01 IST

घोडबंदर रोड आनंदनगर येथील एस.जी. इंग्लिश स्कूलचे प्रकरण मनसेने उघडकीस आणल्यानंतर त्याच संस्थेने अजून एका ठिकाणी सुरु केलेल्या शाळेचा भंडाफोड मनसेने केला आहे

ठाणे : घोडबंदर रोड आनंदनगर येथील एस.जी. इंग्लिश स्कूलचे प्रकरण मनसेने उघडकीस आणल्यानंतर त्याच संस्थेने अजून एका ठिकाणी सुरु केलेल्या शाळेचा भंडाफोड मनसेने केला आहे. या शाळेची फी अवघी १०० रु पये, १५ ते २० विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळा की कोंडवाडा अशा दूरवस्थेत मानपाडा, कृष्णानगर येथील शाळा सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत मनसेने शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करुन सखोल चौकशीची मागणी केली आहे.टिकुजिनी वाडी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कृष्णानगर येथे सदर शाळा सुरू असून या शाळेमध्ये पदवी नसलेले शिक्षक शिकवत आहेत. अस्वच्छ वर्ग, शौचालयांचा अभाव, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी पोषक नसलेले वातावरण, मुलभूत सुविधांपासून विद्यार्थी वंचित अशात २० विद्यार्थ्यांची ही शाळा १०० रुपये महिना तर वार्षिक १५० रुपये घेऊन भरते. ही शाळा तीन वर्षांपासून येथे या अवस्थेत सुरू असून या अगोदर अनिधकृत बांधकाम म्हणून ठाणे महापालिकेने या शाळेवर कारवाई केली होती. तरीसुद्धा गेल्या तीन वर्षांपासून या अवस्थेत ही शाळा सुरू असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. या संस्थेच्या सर्व शाळांतील शिक्षकांची बिंदु नामावलीमार्फत (रोस्टर) चौकशी व्हावी, सदर संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, तसेच अशा संस्थांची दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरु पाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनविसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी केली आहे. या शाळांवर कारवाई न झाल्यास मनसे आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे. यावेळी मनविसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील, ठाणे शहर सचिव सचिन सरोदे व अरविंद बाचकर, उपशहर अध्यक्ष दीपक जाधव व विजय रोकडे, विभाग अध्यक्ष विजय दिघे, उपविभाग अध्यक्ष हेमंत मोरे व इतर उपस्थित होते.कृष्णानगर येथे माझी शाळा होती. परंतू ती ठाणे महापालिकेने तोडल्यावर ती जागा उजाड झाली आहे. एक महिला माझ्याकडे आली आणि तिने मुलांना शिकवण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी मी तिला शिकवण्याची परवानगी दिली. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील पाच ते सहा मुले शिकायला येतात. शाळा नोंदणीकृत नाही.- रामक्रित यादव, विश्वस्त, एस.जी.स्कूल

टॅग्स :Educationशिक्षणthaneठाणे