शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:07 IST

मनविसेच्या दणक्याने कॉलेज प्रशासन ताळ्यावर, पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना न्याय मिळणार

ठाणे- वागळे इस्टेट येथील आयटीआय परीक्षेदरम्यान चुकीचे मार्गदर्शन केल्याने एकाचवेळी ३० विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तात्काळ आयटीआय महाविद्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन ताळ्यावर आले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. याबाबत महाविद्यालय प्रशासन काळजी घेणार असून या प्रकाराला जबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्थात आयटीआयच्या माध्यमातून जुलै २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी ऑनलाईन घोषित करण्यात आला. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या या वार्षिक परीक्षेत टर्नर व फिटर प्रवर्गातील तब्बल ३४ जणांना शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला. तेव्हा परीक्षेदरम्यान वर्गात पर्यवेक्षक असलेल्या मुरलीधर सरवदे या शिक्षकाने उत्तरपत्रिकेवर लिहिली जाणारी माहिती चुकीची सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे धाव घेतली.

मनविसेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन सरोदे यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली. त्यांना धारेवर धरत जाब विचारला. प्रशासनानेही मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत या प्रकरणी आयटीआयचे प्राचार्य एस. एम. अंबाळकर लेखी निवेदन दिले. वरिष्ठ पातळीवर याबाबत दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी उप विभाग अध्यक्ष विनोद भूवड, मनविसे उप विभाग अध्यक्ष गणेश शेलार, प्रसाद होडे, शाखा अध्यक्ष संदीप पवार, उप शाखा अध्यक्ष प्रवीण जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.००

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजMNSमनसे