शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करणा-या ‘त्या’ कैद्याने अखेर सोडले उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 22:55 IST

आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच गेल्या सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने अखेर आपल्या उपोषणाची बिनशर्त सांगता केली आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे: आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच गेल्या सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने अखेर आपल्या उपोषणाची बिनशर्त सांगता केली आहे. काही अधिकारी आणि कारागृहाचे डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये त्याने दूध आणि पावावर हे उपोषण संपविल्याचे जाहीर केल्याने कारागृह प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला.आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असून याबाबत केलेली डीएनए तपासणी देखिल निगेटीव आल्याचा दावा त्याच्यासह त्याच्या कुटूंबियांनी केला होता. त्याच्या उपोषणाची दखल घेत हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्याचे आदेशही जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनीही उपोषण मागे घेण्यासाठी त्याला आवाहन केले होते. कारागृह प्रशासनानेही त्याच्यापुढे हात टेकले होते. मध्यंतरी त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला अनेक दिवस सलाईनवरही ठेवण्यात आले होते. शुक्रवारी ४१ व्या दिवशी मात्र त्याने आपण उपोषण मागे घेत असून दूध आणि पावाची मागणी केली. त्याची ही मागणी तात्काळ पूर्ण करण्यात आली. यावेळी कारागृह अधिकारी एच. बी. पाटील, गुंजाळ आणि डॉ. ए. आर. रंगारी आदी उपस्थित होते.कुटुंबीयांचीही होणार भेटत्याने उपोषणाचा हट्ट धरल्यामुळे त्याची न्यायालयातील सुनावणी आणि कुटूंबियांच्या भेटीसाठी त्याला नियमानुसार बंदी घालण्यात आली होती. त्याला वेगळया बराकीमध्ये ठेवण्यात आले होते. आता मात्र काही क्षण का होईना त्याला त्याच्या कुटूंबियांची भेट घेण्याचीही मुभा देण्यात येणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा