शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएची प्रकरणे झटपट निकाली, ठाण्यात सर्वाधिक प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:22 IST

न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी : वादी-प्रतिवादींचा वेळ, पैसा वाचणार

पंकज रोडेकर 

ठाणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुण्याच्या धर्तीवर ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा अभिनव उपक्रम लवकरच कोकण विभागात राबवणार आहे. त्यामुळे एफडीएसंबंधी प्रलंबित असलेल्या शेकडो प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होऊन वादी आणि प्रतिवादी यांचा पैसा आणि वेळेची बचत होणार आहे. जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित जिल्ह्यांतील प्रकरणांचा दरमहा आढावाही घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या विभागात काही महिन्यांपासून जवळपास एक हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. कोकण विभागाचे मुख्यालय ठाण्यात आहे. त्यामुळे वादी आणि प्रतिवादींना दाद मागण्यासाठी नेहमी ठाण्यात यावे लागते. यामध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. या उपक्रमामुळे हे टळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या अडीअडचणींचा आढावाही घेता येणार आहे. सुरुवातीला हा उपक्रम नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. त्यानंतर, पहिल्यांदा पुण्यात राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील जवळपास ६०० प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यात सर्वाधिक प्रकरणेठाणे जिल्ह्यात प्रकरणांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यात १० उपविभाग आहेत. तेथेच दरमहा जास्तीतजास्त प्रकरणांचा निपटारा लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.एफडीएच्या पुणे विभागामध्ये ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्याच धर्तीवर कोकण विभागातील प्रकरणे मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम लवकरच राबवला जाईल. ही संकल्पना मंत्री गिरीश बापट यांची आहे. पुण्याप्रमाणेच कोकणातही याला चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच जिल्ह्यांमध्ये दरमहा आढावा घेतलाजाईल.- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (कोकण) 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाFDAएफडीए