शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मुलीचा विनयभंग करणार्‍या नराधम पित्यास ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:12 IST

दारूच्या आहारी गेलेला एक नराधम पिता गत सहा वर्षांपासून स्वत:च्याच मुलीचे शोषण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आला. वयाच्या बाराव्या वर्षापासून पीडित मुलगी बापाचा अत्याचार सहन करीत होती.

ठळक मुद्देवयाच्या बाराव्या वर्षापासून शोषणभितीपोटी तक्रार देण्यास उशिरआरोपी पोलीस कोठडीत

ठाणे : लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या बापावर चाकूने हल्ला करून स्वत:ची सुटका करणार्‍या ठाण्यातील एका मुलीची घटना ताजी असताना, पोटच्या मुलीचा सात वर्षांपासून लैंगिक छळ करणार्‍या आणखी एका नराधम पित्याला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.दिलीप कृष्णा शिंदे (वय ४५) हे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, तो वागळे इस्टेटचा रहिवासी आहे. आरोपीला १८ वर्षे वयाची एकुलती एक मुलगी असून, वयाच्या बाराव्या वर्षापासून तो तिचा लैंगिक छळ करीत होता. पत्नी झोपल्यानंतर तो मुलीच्या अंगावरून हात फिरवायचा. अंगावरील पांघरूण काढून तिला जवळ घ्यायचा. नोव्हेंबर २0११ ते मे २0१३ यादरम्यान हा प्रकार सुरू होता. मुलीने हा किळसवाणा प्रकार आईला सांगितला. आईने तिच्या वडिलांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या आहारी गेलेला तिचा पती पुन्हा-पुन्हा मुलीला त्रास द्यायचा. त्यानंतर जवळपास चार वर्षे पीडित मुलगी आईसोबत मावशीकडे शिकण्यासाठी गेली. एप्रिल २0१७ मध्ये ती पुन्हा ठाण्यात शिकण्यासाठी आली. तेव्हापासून तिचा पुन्हा छळ सुरू झाला. या त्रासाला कंटाळून मुलीने शुक्रवारी श्रीनगर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला लगेच अटक केली. आरोपी चालक असून, मुलीने बदनामीच्या भितीपोटी एवढी वर्षे तक्रार दिली नसल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस