शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: October 6, 2023 22:05 IST

ठाणे न्यायालयाचा निकाल: कळव्यातील घटना.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: स्वत:च्याच सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३१ वर्षीय पित्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.

कळव्याच्या घाेलाईनगर भागात राहणाऱ्या या नराधम पित्याने २ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घरातच आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत मुलीच्या आईने आपल्या पतीविरुद्ध ३ डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश देशमुख यांच्या न्यायालयात ६ ऑक्टाेंबर २०२३ रोजी झाली.

सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. शिवाय, पिडित मुलीनेही स्वत: वडिलांविरुद्ध साक्षीच्या वेळी घटना सांगितली होती. हा प्रकार दोनदा घडला होता. तसेच वैद्यकीय चाचणीमध्येही तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. तपासी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे यांनी काम पाहिले. सर्व पुरावे ग्राहय धरुन आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून पोक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय