शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला, ३ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 19:37 IST

महामार्गावर मेंढवनला भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी, मृतांमध्ये एका रत्नागिरीकराचा समावेश

शशिकांत ठाकूरपालघर (कासा) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवन येथे गुरुवारी दुपारी कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले हे कुटुंब पुण्याचे असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

या अपघातात मिलिंद दिनकर वैद्य (वय ५३, रा. रत्नागिरी), हर्षद विश्वास गोडबोले (वय ४३, रा. शिवाजीनगर, पुणे), आनंदी हर्षद गोडबोले (वय ५) यांचा मृत्यू झाला आहे. तर हर्षदा हर्षद गोडबोले (वय ३९) आणि अद्वैत हर्षद गोडबोले (वय १३) हे जखमी झाले आहेत. हर्षद गोडबोले हे टाटा मोटर्समध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर होते, तर मिलिंद वैद्य हे हर्षद यांच्या बहिणीचे पती (भावोजी) आहेत.

गुजरातकडून मुंबईकडे गुरुवारी दुपारी टाटा कार जात असताना मेंढवन येथील तीव्र वळणावर कारचालकाचे नियंत्रण सुटून मुंबई लेनवरून कठडा ओलांडून विरुद्ध बाजूवरील समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून मिलिंद वैद्य हे कार चालवत होते.

भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडीपुण्यातील गोडबोले कुटुंब गुजरात येथून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांची कार मेंढवण येथील अपघाती वळणावर आली असताना हा भीषण अपघात झाला. लहान मुलगी आनंदी हिला गंभीर अवस्थेत कासा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. गंभीर जखमी हर्षला गोडबोले हिला कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी अद्वैत यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले आहेत. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती.