शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 12:49 IST

केंद्रात असणाऱ्या भाजपा सरकारच्या सामाजिक धोरणांविरोधात आज कल्याणमध्येही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कल्याणः  केंद्रात असणाऱ्या भाजपा सरकारच्या सामाजिक धोरणांविरोधात आज कल्याणमध्येही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आमदार संजय दत्त आणि कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ज्यामध्ये काँग्रेसचे कल्याण डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाले.केंद्रात 4 वर्षांपूर्वी आलेल्या भाजपा सरकारने चुकीची आणि द्वेषपूर्ण सामाजिक धोरणं राबवली आहेत. ज्यामुळे सध्या समाजात आपल्याला उभी फूट पडलेली पाहायला मिळत असल्याचे आमदार संजय दत्त यांनी सांगितले. भाजपाच्या या धोरणांविरोधात राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात लाक्षणिक उपोषणाची हाक दिली आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पातळीवर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार लाक्षणिक आंदोलन सुरू असल्याचेही आमदार दत्त म्हणाले. तर विविधतेत एकता ही आपल्या देशाची गेल्या कित्येक दशकांची ओळख आहे. वेगवेगळे समाज याठिकाणी अनेक वर्षांपासून शांततेत राहत आहेत. मात्र जेव्हापासून देशात आणि राज्यांत भाजपा सरकार आले तेव्हापासून इथला जातीय सलोखा बिघडला असून सध्या त्याने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामूळे या उपोषणाच्या माध्यमातून लोकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली.

या आंदोलनात ज्येष्ठ नेत्या अलका आवळस्कर, प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त, डोंबिवली शहराध्यक्ष संतोष केणे, महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी, सुरेंद्र आढाव, विमल ठक्कर, अल्पसंख्याक सेलचे शकील खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत

 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना