शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मनसे कामगार सेनेचे पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण

By नितीन पंडित | Updated: November 1, 2022 18:30 IST

मनसेने केलेल्या उपोषण आंदोलनात मनपा प्रशासनाने कामगारांना लागू केलेला सातवा वेतन शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे व अटी शर्तीनुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात यावी

नितीन पंडित

भिवंडी : भिवंडी महानगर पालिकेमधील शेकडो कामगारांवर प्रशासना कडून अन्याय होत असून नियम व शर्तीचा भंग करून पालिकेचा कारभार सुरू असल्याचा आरोप करत त्याविरोधात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे भिवंडी युनिट अध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालय समोर मनसेने आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. कामगारांच्या प्रश्नांवर गेल्या वर्षभरापासुन प्रशासनाला निवेदन देऊन व आंदोलन करूनही कामगारांना न्याय मिळत नसल्याने कामगारांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत त्यासाठी हे आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती साळवी यांनी दिली आहे.          मनसेने केलेल्या उपोषण आंदोलनात मनपा प्रशासनाने कामगारांना लागू केलेला सातवा वेतन शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे व अटी शर्तीनुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात यावी, अश्वशित प्रगती योजना तात्काळ लागू करावी, अश्वशित प्रगती योजनेचे बारा,चोवीसचे सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावी,२००५ नंतर सेवेमध्ये रुजू झालेले कर्मचारी यांची ०१ जानेवारी २०१९ पासून पेन्शन कॉन्ट्रीब्युशन मध्ये शासन निर्णयाप्रमाणे ४ टक्के वाढीव रक्कम फरकासह कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यामध्ये जमा करावी,कर्मचाऱ्यांची एल.आय.सी नियमाप्रमाणे चालू करण्यात यावी,कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, न्यायालयाच्या निर्णयानुसार भिवंडी शहरात सन २०२३-२४ व त्यापुढे बकरी ईद सणा निमित्त जनावरांची कत्तल करुन अपशिष्ट उचलण्याचे काम सफाई कर्मचारी यांना आदेश निर्गमित करु नये व ती अपशिष्ट उचलण्याचे काम हे ठेकापध्दतीने देण्यात यावे.प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार होत असून त्याची चौकशी करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी मनसेने मुख्यालयासमोर उपोषण आंदोलन केले असल्याची माहिती संतोष साळवी यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीMNSमनसे