धान्य न घेतल्याने शेतकरी व्यथित, भात पेटवण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:07 AM2019-12-28T01:07:59+5:302019-12-28T01:08:25+5:30

भात पेटवण्याचा इशारा : खरेदी-विक्री संघाचे मार्केटिंग फेडरेशनला साकडे

Farmers irritated, warning of paddy burning due to lack of grain | धान्य न घेतल्याने शेतकरी व्यथित, भात पेटवण्याचा इशारा

धान्य न घेतल्याने शेतकरी व्यथित, भात पेटवण्याचा इशारा

Next

मुरबाड : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला असल्याने मिळालेल्या तुटपुंज्या पिकाची बाजारात विक्र ी करण्यासाठी गेलेल्या शेतकºयाचा भात खरेदी करण्यास केंद्राने नकार दिल्याने व्यथित झालेल्या दीपक ठाकरे या शेतकºयाने तहसीलदार कार्यालयासमोर भात पेटवून देण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे खरेदी-विक्री संचालक मंडळात खळबळ उडाली असून अध्यक्ष मधुकर केदार व उपाध्यक्ष जगन्नाथ घुडे, प्रकाश पवार यांनी ते धान्य खरेदी करण्याचे आदेश मिळावेत, म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला साकडे घातले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना मुरबाड खरेदी-विक्र ी संघाकडून मात्र शेतकºयांचे ते आदेश पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार ठाकरे यांच्यासंदर्भात घडला. ठाकरे यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. ते शंभर ते दीडशे पोती भात पिकवतात. त्यातील आपल्या परिवारासाठी लागणारे धान्य साठवून ठेवतात व काही धान्य हे विक्र ी करून आपला घरखर्च भागवतात. परंतु, यावर्षी अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले. खळ्यातील धान्य हे भिजल्याने भाताला बुरशी आल्यामुळे ते थोड्या प्रमाणात काळसर पडले आहे. मात्र, त्यातील दाणा हा पांढरा असताना हे धान्य खाजगी व्यापारी कवडीमोलाने घेतात. तेच धान्य सरकारच्या खरेदी-विक्री संघाला विकले जाते. ठाकरे यांनी धान्य संघाच्या खरेदी केंद्रात नेले असता ते काळे पडले आहे, त्याला बुरशी आली आहे, अशी कारणे देत ते खरेदी करण्यास भातखरेदी केंद्राने नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या ठाकरे यांनी धान्य इतरत्र फेकून देण्यापेक्षा ते तहसीलदार कार्यालयासमोर पेटवून देणार असल्याचे निवेदन तहसीलदार, खरेदी-विक्र ी संघ व मुरबाड पोलीस ठाणे यांना सादर केले.
शेतकºयांमधील असंतोष लक्षात घेता खरेदी-विक्री संघाने सरसकट भातखरेदी करण्याचे आदेश मिळण्यासाठी तहसीलदारांमार्फत राज्य सरकार व अन्न नागरी पुरवठा विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभाग व मार्केटिंग फेडरेशन यांना साकडे
घातले आहे.
 

Web Title: Farmers irritated, warning of paddy burning due to lack of grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.