शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

कृषी खाते बेफिकीर तर शेतकऱ्यांना रोगांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:49 IST

जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले.

- हितेंन नाईकपालघर : जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. मात्र काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळत असल्यातरी निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकºयामधून व्यक्त केली जात आहे. तर जिल्ह्यातील सर्व धरणे पाण्यानी भरलेली आहेत.जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. त्यापैकी ७५ हजार २१.४४ हेक्टर क्षेत्रावर पुर्नलागवड (९८.२१ टक्के) करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नागली पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार २०५ हेक्टर असून १२ हजार १७१.६३ टक्के (१०९ टक्के) क्षेत्रावर पुनर्लागवड करण्यात आली आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार ५९६ हेक्टर असून ३०३९.८८ हेक्टर क्षेत्रावर (८४.५४ टक्के) पेरणी झाली आहे. तूर पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ५४६ हेक्टर असून २ हजार ४४१.८८ हेक्टर क्षेत्रावर (९५.९१ टक्के) क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस २५७७.८० मिमी.एवढा आहे. माहे जून महिन्याची पावसाची सरासरी ४२६.०० मिमी होती. त्या तुलनेत जून महिन्यात ६८७.०० मिमी एवढा पाऊस पडलेला आहे. जुलै महिन्याच्या पावसाची सरासरी १०४७.८० मिमी असून आज अखेर १६५३.७३ मिमी इतका पाऊस पडलेला आहे. आॅगस्ट महिन्याची पावसाची सरासरी ६२६.८० मिमी असून आज अखेर २७६.६० मिमी पाऊस (४४.१० टक्के) पडला आहे.सूर्या या मोठ्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडासची क्षमता २८६.३१ द.ल.घ.मी. असून ते पूर्ण भरलेले आहेत. वांद्री मध्यम प्रकल्पात ३५.९३८ द.ल.घ.मी पाणीक्षमता असून ते ही पूर्ण भरलेले आहे. तर जिल्ह्यात एकूण ६ लघु पाटबंधारे असून त्या पालघर तालुक्यात माहीम केळवे, मनोर आणि देवखोप. विक्रमगड तालुक्यात मोहखुर्द व खांड तर डहाणू तालुक्यातील रायतळे यांचा समावेश असून ही सर्व धरणे पूर्ण भरली आहेत.भात रोपांची पुनर्लागवड नुकतीच झाली असून रोपास फुटवे येत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेल्या क्रॉपसॅप सर्वेक्षणानुसार पालघर तालुक्यातील माण, वाडा तालुक्यातील गारगाव, जव्हार तालुक्यातील गोरठन तर डहाणू तालुक्यातील भराड येथील काही शेतकºयाच्या शेतात खोडकीडा, निळा भुंगेराचे प्रमाण आढळून आले असून ते नुकसान पातळीच्या आत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील नाईक यांनी दिली. मात्र जिल्ह्यात कुठेही करपा रोगाची लागण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून पावसात खंड पडला असला तरी पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर