शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे आता रब्बीच्या पिकांचा ‘ई पीक पेरा’ माेबाईल ॲपवर नाेंद करा - माने

By सुरेश लोखंडे | Updated: November 7, 2023 18:36 IST

Thane: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळण्यासाठी, याशिवाय शेतातील पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटपासह पीएम किसान योजना, यांत्रिकीकरण योजना आदी शासनाच्या विविध योजनाच्या लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदाराने पीक ‘पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंद करणे आवश्यक आहे.

- सुरेश लोखंडे  ठाणे - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळण्यासाठी, याशिवाय शेतातील पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटपासह पीएम किसान योजना, यांत्रिकीकरण योजना आदी शासनाच्या विविध योजनाच्या लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदाराने पीक ‘पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंद करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आताही या रब्बी हंगामाचा ‘ई पीक पेरा’ नोंदीला सुरूवात झाली असून १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. यास अनुसरून ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तत्काळ, आजच मोबाईलमध्ये ‘ॲप डाऊनलोड करून ही ई पीक पाहणी नाेंद करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

 शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, नुकसान भरपाई मदत व किमान आधारभुत किंमतीनुसार खरेदीच्या लाभाकरिता शेतकऱ्यांनी आजच ई पिकांची नोंद मोबाईल ॲपद्वारे करावी, असे माने यांनी केले आहे. गेल्या वर्षीच्या ॲपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अॲप (२.०.१४) यावर्षी सुरू केले आहे. नवीन सुविधांमध्ये विविध सुविधांचा समावेश आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली ‘ई-पीक पाहणी’ ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येणार आहे.

गेल्या वर्षीच्या ॲपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अँप  (२.०.१४) यावर्षी सुरू करण्यात आलेले  आहे. नवीन सुविधांमध्ये पुढील सुविधांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्याआधारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीthaneठाणे