शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर भागातील मेट्रो यार्डच्या बाधीत शेतकऱ्यांना मिळाला अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 18:11 IST

मागील काही दिवसापासून थांबलेल्या मेट्रो यार्डचे काम आता येत्या १६ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमेट्रो यार्डचे काम १६ नोव्हेंबर पासून होणार सुरुजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय

ठाणे - मुंबई ठाणेमेट्रोसाठी घोडबंदर भागातील कावेसर वाघबीळ येथे यार्ड उभारण्याचे काम मेट्रो कंपनी मार्फत सुरु झाले आहे. त्यानुसार येथे मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु झाले आहे होते. परंतु येथील शेतकरी जमीन देण्यास तयार असतांना सुध्दा त्यांच्या मागणीचा विचार न झाल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी येथील काम बंद पाडले होते. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर १६ नोव्हेंबर पासून पुन्हा यार्डच्या कामाला सुरवात होणार आहे.                        येथील जमिनीच्या संपादनासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली असून या कामासाठी एमएमअरडीएने रिलायन्स कंपनीस ठेका दिला आहे. त्यानुसार या कंपनीने या जागेवर काम चालू केले आहे. प्रत्यक्षात ही जागा शेतजमीन येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या असून ते या शेतजमिन पिढ्यांपिढ्यांपासून कसत आहेत. मात्र या शेतकºयांना विश्वासात न घेता शेतजमनीत मातीभरणीचे काम सुरु झाले आहे. येथील शेतकरी मुंबई ठाणे मेट्रोसाठी लागणारे कास्टींग यार्ड उभारण्यासाठी त्यांच्या शेतजमीनी देण्यास तयार आहेत. परंतु या जमिनीचा मोबदला पैशाच्या स्वरुपात द्यावा किंवा या जमिनीचे भाडे सुरु करावे अशी मागणी यापूर्वी सरनाईक यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान आमदार सरनाईक यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु होते. त्यानंतर त्यांनी हे काम बंद पाडले होते.             दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली असता सरनाईक यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. सर्वे नं. ३११,३१३,३१४, ३१५ या शेतजमिनीचे शेतकºयांकडे असलेली कागदपत्रे १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावीत व सर्व्हे नं. २६७ ही जमिन वहिवाट शेतकरी गेल्या ६० वर्षांपासून नावावर करण्यासाठी पाठपुरावा करत होते. ती जमीन वहिवाट नावावर करून देण्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे मुंबई मेट्रोसाठी लागणारे कास्टिंग यार्ड उभारण्यासाठीचे काम आता १६ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाMetroमेट्रो