शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या आघाताने तुटली कुटुंबाची नाळ, पत्नीचा शोध, मुलांच्या ताब्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:06 IST

लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे.

-  प्रशांत माने डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय गेल्याने अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यातूनच कुटुंबाची वाताहत झाल्याचे वास्तव नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून उघड झाले आहे. तान्हुली मुले बेवारस स्थितीत सोडून बेपत्ता झालेल्या पत्नी रत्नमालाचा एकीकडे शोध घेत असताना दुसरीकडे मुलांचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात सुब्रत साहू यांची सुरू असलेली धडपड काळजाला हात घालणारी आहे.कचोरे खाडीच्या परिसरात दोन लहान मुलांना सोडून रत्नमाला बेपत्ता झाली. चार दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही. मुलांना डोंबिवलीतील ‘जननी आशिष’ या बालसंगोपन केंद्रात ठेवले आहे. त्यांचे वडील सुब्रत यांची पत्नीचा शोध घेण्याबरोबरच मुलांचा ताबा घेण्यासाठीही धडपड सुरू आहे.साहू कुटुंब ठाकुर्लीतील ९० फुटी रोड परिसरात राहते. सुब्रत यांचा सलूनचा व्यवसाय होता, तर रत्नमाला ब्युटी पार्लर चालवायची. परंतु, लॉकडाऊनमध्ये दोघांचे व्यवसाय बंद पडले. त्यातच सुब्रत यांचा अपघात झाल्याने हे कुटुंब पुरते कोलमडले होते. या ताणातूनच रत्नमालाने आत्महत्या केली का, अशी शंका ती बेपत्ता झाल्याने उपस्थित होत आहे. परंतु, खाडीकिनारी तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली की अन्य काही, या चर्चांनाही उधाण आले आहे. सुब्रत हे पत्नीच्या शोधासाठी एकटेच सर्वत्र फिरत आहेत. त्यांच्या सोबतीला ना त्यांचे नातेवाईक अथवा मित्र. विष्णूनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांची वारी असो. तसेच मुलांच्या ताब्यासाठी उल्हासनगरमधील बालकल्याण समितीपुढे सुनावणीसाठी जाणे असो, यात त्यांची फरफट होत आहे.मुले ‘जननी आशिष’ बाल संगोपन केंद्रात असल्याने सुब्रत यांनी तेथे भेटीसाठी बुधवारी धाव घेतली. परंतु, कोरोनाच्या नियमाप्रमाणे मुले पाच दिवस क्वारंटाइन असल्याने ती जवळून भेटू शकली नाहीत. लांबूनच त्यांना मुलांना पाहता आले. दरम्यान, मुलांचा ताबा मिळण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. पोलीस ठाण्यात हे प्रकरण असल्याने त्यांचीही परवानगी लागणार असून मुलांची काळजी घेण्याची हमी मिळाल्यावरच त्यांचा ताबा सुब्रत यांना मिळणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.सांभाळण्यासाठी महिला असेल, तरच मुलांचा ताबाघरात मुलांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम महिला असल्यास मुलांचा ताबा घेऊ शकता, असा निर्णय बाल कल्याण समितीने गुरुवारच्या सुनावणीदरम्यान दिल्याने सुब्रत यांना दिलासा मिळाला आहे. सुब्रत घरी सध्या एकटेच आहेत. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची व्यवस्था केल्यानंतरच मुलांना घरी नेता येणार आहे. तोपर्यंत जननी आशिष येथेच दररोज मुलांना भेटण्याची परवानगीही त्यांना देण्यात आली आहे.  

टॅग्स :Familyपरिवार