शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलमधून कुटुंबाला आला फोन, तुमचा रुग्ण दगावला, घरी रडारड सुरु झाली पण त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 13:31 IST

कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयु बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते.

मीरारोड - कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेच्या कुटुंबीयांना चक्क रुग्ण मरण पावल्याचा फोन भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातून केला गेला होता.  त्यानंतर महिलेच्या नातलगांची रडारड झाली. पण नंतर मात्र चुकून फोन केला गेल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांंनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयू बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी कडून शहरातील एका खाजगी रुग्णालयाचे नाव सुचवून 1 लाख अनामत रक्कम व 50 हजार रोज असे शुल्क सांगण्यात आले. परंतु तेवढी ऐपत नसल्याने सदर रुग्णाच्या नातलगांना मुंबईच्या नायर रुग्णालयात खाट उपलब्ध झाली.नायर रुग्णालयात नेण्यासाठी पालिकेने रुग्णवाहिका नसल्याचे सांगीतल्याने मुंबई भागातील एका खाजगी कार्डिएक रुग्ण वाहिकेस भाईंदरला येऊन नायरला नेण्याकरीता 12 हजारांचे भाडे ठरवले. 3 रोजी सकाळी रुग्णवाहिका मुंबई वरुन निघाली असताना दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना जोशी रुग्णालयातून बोलत असल्याचा फोन आला आणि तुमचा रुग्ण मरण पावल्याचे सांगण्यात आले. ते एकुन नातलग रुग्णालया जवळ गोळा झाले. त्यांची रडारड सुरु होती.मुंबईवरुन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकास येऊ नको असा निरोप दिला. पण नातलगांनी रुग्णालयात चौकशी केली तेव्हा मात्र रुग्ण जिवंत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने नातलगांचा संताप अनवार झाला. मग पुन्हा रुग्णवाहिका चालकास येण्यास कळवले असता तो पर्यंत नायर रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा बेड निघून गेल्याने मग सेव्हन हिल्स रुग्णालयात रुग्ण महिलेस नेण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक यांनी घडल्या प्रकाराची माहिती देत एकूणच पालिका कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या आधी देखील जोशी रुग्णालयात एका मुलास त्याच्या कोरोनाग्रस्त वडिलांचा मृतदेह ऐवजी दुसराच मृतदेह दिला होता. डोक्यावरील केसा वरुन वेळीच मुलाला कळले म्हणून गंभीर चूक टळली होती. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकcorona virusकोरोना वायरस बातम्या