शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांसाठीचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 17:22 IST

कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल व कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयातील ८०० जणांचा सहभाग

डोंबिवली: अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचाऱ्यांना रोजच्या ताण-तणावातून कांही क्षण विरंगुळा मिळावा या उद्देशातून कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यास यावर्षीपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार कोंकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल व कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांतर्गत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याण पश्चिममधील प्र. के. अत्रे नाट्यगृहात नुकताच आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात झाला. 

कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता. दिनेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित स्नेहमेळाव्याचा मनमुराद आनंद वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना. नाळे म्हणाले, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून व मानव संसाधन विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त). पवन कुमार गंजू यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा, नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात.

आता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही अशा उपक्रमात सहभागी करून ऊर्जा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक उर्जावान करण्यासाठी स्नेहमेळावा सुरु करण्यात आला आहे. मुख्य अभियंता श्री. अग्रवाल म्हणाले, सीमेवर तैनात सैनिकांप्रमाणेच वीज कर्मचारीही जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करतो. त्यामुळेच ग्राहक अखंडित विजेचा आनंद घेऊ शकतो. या कर्मचाऱ्यांच्या कामात उत्साह निर्माण करण्यात स्नेहमेळावा उपयोगी ठरेल. 

प्रख्यात संमोहन तज्ज्ञ डॉ. प्रक्षित गायकवाड यांनी छोट्या-छोट्या गोष्टींमधून कामात कसा आनंद निर्माण करता येईल, यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच कांही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संमोहित करून संमोहनाचे महत्व मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवून दिले. डॉ. गायकवाड यांच्या खिळवून ठेवणाऱ्या कार्यक्रमाने उपस्थित कर्मचारी व कुटुंबीयांनी मंत्रमुग्ध केले.

पूर परिस्थितीत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सन्मान याप्रसंगी करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री शैलेंद्र राठोर, धर्मराज पेठकर, सुनील काकडे, प्रवीण परदेशी, विजय मोरे, ज्ञानेश कुलकर्णी, महाव्यवस्थापक श्री. अनिल बराटे, सहायक महाव्यवस्थापक. सुनील पाठक, उप-महाव्यवस्थापक योगेश खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक महाव्यवस्थापक  धैर्यशील गायकवाड आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, सर्व कार्यकारी अभियंते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जवळपास ८०० कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रmahavitaranमहावितरण