शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम आरक्षणासंदर्भात TDP चा मोठा दावा; शपथविधीपूर्वीच भाजपचं टेन्शन वाढवलं!
2
नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
3
Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
4
ब्रेन ट्यूमरचा सर्वाधिक धोका कोणाला?; जाणून घ्या, होण्यामागचं कारण, 'ही' आहेत लक्षणं
5
Malaika Arora : "मी फक्त म्हातारी नाही, तर तरुण मुलाला..."; 12 वर्षांचं अंतर, मलायकाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
6
T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात वाईट दिवस; वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया
7
PM Narendra Modi : पीएम मोदींच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातील नेते उपस्थित राहणार; वाचा पाहुण्यांची यादी
8
'कंगनासाठी प्रेम नाही पण...', शबाना आजमी यांची प्रतिक्रिया चर्चेत; 'थप्पड' प्रकरणावर केलं भाष्य
9
तीन दिवसांत Sensex ४६१४ अंकांनी उसळला, ₹२८६५७४२३६००००० नं वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती
10
Manoj Jarange Patil : "...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार"
11
नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!
12
Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
13
'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज
14
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
15
कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..."
16
Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई
17
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
18
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
19
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला

‘भांडवली अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी नोटाबंदीचा घाट’

By admin | Published: February 16, 2017 1:45 AM

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली

ठाणे : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लोकांवर अचानक बंधनकारक केली, असे सांगितले जात असले तरी यामागचा खरा डाव भांडवली अर्थव्यवस्थेचा फायदा करून देणे हा असावा, असे मत ज्येष्ठ लेखक आणि अर्थसमीक्षक संजीव चांदोरकर यांनी व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या समारोप सत्रात ‘नोटाबंदीचा ताळेबंद’ या विषयावर ते बोलत होते. खरेतर, सरकारने नोटाबंदी नव्हे, तर नोटाबदल केला. एक हजारच्या जागी दोन हजाराच्या नोटा चलनात आणून सरकारने काय साधले? या देशातील सुमारे ८५ टक्के जनता कॅश आधारित व्यवहार करीत असताना त्या जनतेला कॅशलेस व्यवहाराकडे जबरदस्तीने ढकलणे लोकशाहीत बसणारे ठरते का, असा सवालही चांदोरकर यांनी केला. सर्वसामान्य लोक कॅशमध्ये व्यवहार करतात, म्हणजे ते काळा पैसा निर्माण करतात, असे मानणे सर्वथा चुकीचे असून आयकरप्राप्त उत्पन्न नसणारे सर्वसामान्य या देशात सुमारे ८० टक्के लोक असून त्यांना असुरक्षित करणारे धोरण नोटाबदलीतून साधले गेले, असे ते पुढे म्हणाले. कॅशलेस व्यवहारात प्रत्येक विनिमयाची किंमत चुकवावी लागते. साधा डेबिट आणि क्रेडिटकार्ड यातील फरकही ठाऊक नसणारी बहुसंख्य जनता या देशात असताना अशा तथाकथित सुधारणांसाठी २०१६ चा मुहूर्त योग्य होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इंटरनेट, नियमित वीजपुरवठा यांची देशात आजही वानवा असताना ही उठाठेव अनाठायी होती. मोबाइल कंपन्या, क्रेडिटकार्ड कंपन्या, इंटरनेट कंपन्या यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय झाला असावा. कारण, कॅशलेस व्यवहारांमुळे उपलब्ध होणारा ‘ग्राहक व्यवहार डेटा’ या कंपन्यांसाठी लाखमोलाचा असणार आहे. या संपूर्ण प्रक्रि येत भारतीय रिझर्व्ह बँकेचे अवमूल्यन झाले, हीदेखील चिंताजनक बाब असल्याचे चांदोरकारांनी पुढे नमूद केले. अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवक मंडळाचे अविनाश कोरडे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन, तर सुनील दिवेकर यांनी शेवटी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)