शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसाने मंगळसूत्र लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:24 IST

प्लास्टिक पिशव्या बाळगल्याप्रकरणी दुकानदार महिलेला धमकावत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोतया पोलिसाने लांबवल्याची घटना सोमवारी शहरातील शिवाजी उद्योगनगरमध्ये घडली.

डोंबिवली : प्लास्टिक पिशव्या बाळगल्याप्रकरणी दुकानदार महिलेला धमकावत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोतया पोलिसाने लांबवल्याची घटना सोमवारी शहरातील शिवाजी उद्योगनगरमध्ये घडली.मानपाडा रोड लागतच्या शिवाजी उद्योगनगरमधील मीना जनरल स्टोअर्समध्ये सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास एक जण आला. त्याने दुकानातील महिलेकडून अर्धा लिटर दूध आणि भजीची दोन पाकिटे मागितली. या वेळी त्याच्या मागणीनुसार महिलेने प्लास्टिकची पिशवी देताच या पिशव्या बंद झाल्या मग तुम्ही कशा वापरत, असा सवाल केला. या पिशव्या वापरल्याप्रकरणी १७ हजारांचा दंड भरावा लागेल, असे धमकावले. दुकानात अजून पिशव्या आहेत का, असे विचारत गल्ला उघडून त्यात पिशव्या शोधू लागला. त्या न मिळाल्याने त्याने महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र काढून घेतले. मानपाडा पोलीस ठाण्यात १० मिनिटात या दंड भरा आणि मंगळ्सूत्र घेऊन जा, असे सांगत रिक्षेतून पोबारा केला. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे पोलिसांनी तोतया पोलीसाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, कल्याणमधील एका महिला दुकानदारालाही तोतया पोलिसाने धमकावत तिच्याकडील ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची नुकतीच घडली होती. या प्रकारानंतर त्या तोतया पोलिसाने डोंबिवलीत मोर्चा वळवल्याचे सोमवारच्या घटनेवरून दिसते.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या