शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

कारवाईविरोधात फेरीवाल्यांचा डोबिंवलीत मेळावा, शेकडो फेरीवाल्यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 1:49 PM

डोंबिवली- फेरीवाल्यांवर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या कारवाईच्या विरोधात डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांनी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक सवाल फेरीवाल्यांनी उपस्थि केले आहेत. आम्ही व्यवसाय नाही केला तर काय भिका मागायच्या का? आमच्या मुला-बाळांची पोटं कशी भरणार? महापालिका आमचं पुनर्वसन कधी करणार?, असा सवाल फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे. डोंबिवली परिसरातील शेकडो ...

डोंबिवली- फेरीवाल्यांवर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या कारवाईच्या विरोधात डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांनी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक सवाल फेरीवाल्यांनी उपस्थि केले आहेत. आम्ही व्यवसाय नाही केला तर काय भिका मागायच्या का? आमच्या मुला-बाळांची पोटं कशी भरणार? महापालिका आमचं पुनर्वसन कधी करणार?, असा सवाल फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे. डोंबिवली परिसरातील शेकडो फेरीवाल्यांनी मेळाव्याला हजेरी लावली आहे.  

महापालिका अधिकारी संजय कुमावत गेल्या 12 वर्षांपासून एकाच ठिकाणी. फेरीवाल्यांकडून जप्त केलेला माल मोठ्या मॉल्सला विकतात. त्यातून त्यांनी दिवाळीत लाखो रुपये त्यांनी कमवले. फेरीवालाविरोधी पथकातील कर्मचारी ते आयुक्तांपर्यंत सर्वाना हफ्ता पाहीजे आहे.आजपर्यंत त्यांनी आपल्याकडून हफ्ते घेतले आणि तरीही आज आपल्यावर कारवाई करीत आहेत, असा आरोप  शिवगर्जना भाजीविक्रेते मंडळाच्या भाऊ पाटील यांनी केला आहे. 

आपल्या जीवावर हा वळू (राज्यकर्ते) माजला आहे. त्याला वेसण घालावे लागेल. आपल्याकडून खाऊन आपणच पोसून हा वळू माजला आहे. त्याला वेसण घातल्याशिवाय तो आपलं ऐकणार नाही. आज राज्य शायनिंग इंडियावाल्यांचे राज्य आहे .त्यांच्या स्मार्ट सिटीमध्ये आपल्यासारख्या लोकांना स्थान नाही.आपल्या पगारावर माजलेला वळू पालिका कमिश्नर आपल्यावरच कारवाई करतोय.ही हिटलरशाही नाही का?, असं  कष्टकरी हॉकर्स आणि भाजीविक्रेते युनियनचे सल्लागार   प्रशांत सरखोत यांनी म्हंटलं. 

राजाजी पथ रोडवर हळबे आणि गणेश मंदिर  संस्थानाचे प्रवीण दुधे यांनी हप्ते घेतले त्याची चौकशी राज ठाकरे करणार का? असा सवाल सरखोत यांनी केला. आम्ही न्यायालयात धाव घेणार असून अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची दाद मागणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं.