शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमभंगातून विद्यार्थ्याचा स्वत:वर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 22:45 IST

घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याने पोलिसांना संशय आला.

भार्इंदर - काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागाच्या काशिमिरा शाखेला देण्यात आली. शाखेसह काशिमिरा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाय््राांनी घटनास्थळी धाव घेतली असता जखमी अवस्थेतील त्या युवकास पोलिसांनी त्वरीत मीरारोड येथील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले.

पोलिसांनी त्या युवकाकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला दोन अज्ञात इसमांनी आपल्यावर गोळीबार केल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्या युवकाने एकतर्फी प्रेमभंगातून आपणच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचे नाव जयप्रकाश दिनेश गिरी (२१) असे असुन तो २०५, निळकंठ सोसायटी, हनुमान नगर, समता नगर, कांदिवली पुर्व, मुंबई येथे राहतो.

तो एका महाविद्यालयात कॉमर्सच्या शेवटच्या वर्गात शिकत असुन आपल्या शिक्षणाचा  खर्च भागविण्यासाठी तो घरात खाजगी शिकवणी घेतो. त्याचे, तो शिकत असलेल्या महाविद्यालयातीलच एका विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने त्याबाबत त्या विद्यार्थीनीला सांगुन आपल्यासोबत लग्न करण्याची तीला गळ घातली. त्याला त्या विद्यार्थीनीने नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात स्वत:वर गावठी कट्यातून कंबरेजवळ गोळी झाडल्याचे चौकशीतुन समोर आले. हा कट्टा त्याने उत्तरप्रदेशातील आझमगड येथून आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी त्या विद्यार्थ्यावर हत्यारबंदी कायद्यासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काशिमिरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास मीरारोड विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अतुल कुळकर्णी हे करीत आहेत.