शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

कारखान्यांची झाडाझडती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:24 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘रासायनिक बॉम्ब’ : ११ एमआयडीसींसह बेकायदा गोदामांचे जाळे

सुरेश लोखंडे ठाणे : उरण येथे वायुगळतीमुळे मंगळवारी लागलेली आग, धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडीच्या कारखान्यास लागलेली आग. या घटनांवरून धडा घेऊन ठाणे जिल्ह्यातील धोकादायक केमिकल्स वापरणाऱ्या औद्योगिक पट्ट्यातील, शेकडो कारखाने, फॅक्टरी, गोडाउन यांची ‘स्थळ पाहणी अहवाल’ करून आडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. उपरोक्त आगींसह भिवंडीतील गोदामपट्ट्यांत लागलेल्या गेल्या काही दिवसांतील आगीच्या दुर्घटना पाहता याची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्यागिक पट्टा ठाणे जिल्ह्यात आहे. सुमारे ११ एमआयडीसी क्षेत्रांसह जागतिक दर्जाच्या ट्रान्स ठाणे क्रीक (टीटीसी) हा औद्योगिक पट्ट्यात जीवघेणे केमिकल्स रोज वापरले जात आहे. याशिवाय परदेशातील उत्पादकांच्या साठवणुकीसाठी मुंबई- नाशिक महामार्गावरील भिवंडी पट्ट्यात अनधिकृत गोडाउनचे जाळे असून त्यातील विनापरवाना ठेवल्या जाणाºया रासायनिक स्पोटकांमुळे लागणाºया आगी व औद्योगिक पट्ट्यातील वायुगळती जीवितास घातक ठरत आहे. त्यावर नियंत्रण करणारी खास आपत्ती प्रतिबंधक यंत्रणा जिल्ह्यात सक्षम करण्याची अत्यंत गरज आहे.तत्पूर्वी या ठिकाणाचा स्थळ पाहणी अहवाल काळजीने करून त्याची अंमलबजावणी सक्तीने करण्यास भाग पाडण्याची गरज निर्माण झाली आहे.१९३ गोदामांमध्ये रासायनिक विस्फोटकेया अनधिकृत गोदामांमध्ये सर्वाधिक आगीच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी अवघ्या आठ महिन्यात ८३ दुर्घटना होऊन ४८ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी शेकडो आगीच्या व वायुगळतीच्या घटना घडूनही त्या गुलदस्त्यात आहेत. महामार्गालगतच्या भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी गावांजवळ शेकडो गोडाउन आहेत. त्यातील बहुतांशी अनधिकृत आहेत. कांदळवन नष्ट करून सुमारे १०० गोडाऊनची यादी प्रशासनाच्या हाती आहेत. या गोडाऊन पट्ट्यात १९३ गोडाउनमध्ये बिनदिक्कत रासायनिक विस्फोटकांचा साठा होत असल्याचे सांगितले जाते. या परिसरात केवळ चार गोदाममालकांकडे परवाना असल्याचेही सांगितले जाते. याव्यतिरिक्त अन्यही ठिकाणी विस्फोटकांचा साठा होत असल्याचा संशय आहे. या अशा ठिकाणांचा कारखान्यांचा, फॅक्टरीज आदींचा शोध घेऊन त्यांना परवानगी मिळालेले केमिकल व त्यांच्याकडून बेकायदेशीर वापरले जाणाºया केमिकलचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. याशिवाय सरकारी यंत्रणांकडून स्पॉट आॅडिट करून त्यांनुसार सक्तीची अंमलबजावणीची गरज सध्या आहे.येथे लागल्या आहेत आगीया आधी रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्या जवळील केमिकल कंपनीची दुर्घटना,घोडबंदर रोडवर केमिकलने भरलेले बीपीसीएलचे टँकर, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमिकलचे गोदाम,नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोदामची आग, ओवळी येथील गोदामाची आग, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाउन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली आदी ठिकाणी आगीच्या घटना आणि गेल्या काही दिवसांपूर्वी याच भिवंडीतील कारखान्यास लागलेली आग आदी घटना दुर्लक्षित व निष्काळीपणातून झालेल्या दिसून येत असल्याचे वास्तव तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :fireआगthaneठाणे