शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांसाठी शिक्षकांची बनावटगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:48 IST

खोटे वैद्यकीय दाखले जोडले; न्यायालयात जाण्याचा इशारा

ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मंगळवारी झाल्या. मात्र, काही शिक्षकांनी प्राधान्यक्रमाने सोयीच्या शाळेवर बदलीसाठी खोटी माहिती, बोगस वैद्यकीय दाखले आदी खोटी माहिती दिल्याची चर्चा आहे. शहानिशा करून हा अन्याय दूर करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अन्यथा प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षकांमध्ये दिसून येत आहे.या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार न करता या बदल्या झाल्याची चर्चा आहे. या शिवाय या जिल्हाअंतर्गत बदल्या करताना शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सोयीच्या बदल्या केल्याचा आरोप केले जात आहे. दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोयीच्या शाळा घेतल्याची माहिती अन्यायग्रस्त शिक्षकांच्या हाती लागली आहे. त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. या बदल्यांमध्ये पतीपत्नीचे एकत्रीकरण करताना दोघाच्या शाळेतील अंतर ३० किलोमीटर असल्याची खोटी माहिती नोंदवण्यात आली असल्याचे ऐकायला मिळत आहे. या बदल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातीलच शिक्षकांना पती पत्नी एकत्रीकरणाच लाभ मिळावा, असे शासननिर्णयात नमूद केले आहे. पण इतर जिल्हा परिषदेच्या ३० किलोमीटरच्या शाळा दाखवून लाभ घेतल्याचे बोलले जात आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकांची शाळा अवघड नसतानादेखील ती शाळा अवघड असल्याचे दाखवून सोयीच्या शाळेचा लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. याची प्रशासनाने खातरजमा करण्यासह दुर्धर आजाराचे खोटे दाखले दिल्याचे बोलले जात आहे. याप्रमाणेच विविध संवर्गात लाभ घेणाऱ्या शिक्षकांची कागदपत्रे, पतीपत्नीचे अंतर प्राथमिक स्तरावर तपासून खातरजमा न केल्याने त्यांना प्राधान्यक्र माचा लाभ सरसकट दिल्याने इतरांवर अन्याय झाल्यामुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.न्यायालयीन आदेशाचे उल्लंघनशिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत या आॅनलाइन बदल्या पुणे येथून ‘एनआयसी’ यंत्रणेव्दारे केल्या आहेत. सर्व शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.उच्च न्यायालयाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासननिर्णया प्रमाणे कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले असताना याचे उल्लंघन होऊन या बदल्यांची प्रक्रि या राबवली आहे.त्यात अनेक शिक्षकांनी खोटी माहिती देऊन बहुतांशी पात्र व सेवाज्येष्ठता असलेल्या शिक्षकांना आदिवासी दुर्गमभागातील अवघड क्षेत्राच्या शाळांवर जाण्याचा प्रसंग ओढवला आहे. यात शिक्षिकांचाही मोठ्याप्रमाणात समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक