शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांच्यासाठी सुविधांना प्राधान्य असावे - प्रशांत दामले

By अजित मांडके | Published: February 01, 2024 3:05 PM

रंगायतनमधील कार्यक्रम सुरू ठेवून करता येणारे दुरुस्ती काम आणि रंगायतन बंद ठेवून करायचे दुरुस्ती काम याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

ठाणे  : ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाचे नुतनीकरण नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांच्यासाठी सुविधा देणारे असावे. तसेच ते नेटकेपणाने केले जावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.  ठाणे शहराची असलेल्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या नुतनीकरणाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून त्या दृष्टीने नाट्यकर्मींच्या सूचना जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

त्यानुसार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता प्रशांत पाठक यांची बैठक गडकरी रंगायतन नुकतीच झाली. त्यात रंगायतनमधील तांत्रिक आणि अतांत्रिक सुधारणांची चर्चा करण्यात आली.  या बैठकीत, गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणात आसनव्यवस्था बदलताना सध्या असलेली खुर्च्यांची संख्या कमी केली जाऊ नये, प्रेक्षकांसाठी लिफ्टची सोय केली जावी आणि स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ राहतील, याची काळजी घेतली जावी, अशा काही सूचना दामले यांनी केल्या. तसेच, रंगायतनची ध्वनीक्षेपण यंत्रणा चांगली आहे, मात्र बाल्कनीतील प्रेक्षकांना अधिक सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी तिथे जास्तीचे स्पीकर बसवण्यात यावेत, असेही दामले यांनी सांगितले. रंगमंच, ग्रीन रूम आदींबाबत त्यांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली.  रंगायतनमधील कार्यक्रम सुरू ठेवून करता येणारे दुरुस्ती काम आणि रंगायतन बंद ठेवून करायचे दुरुस्ती काम याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. नुतनीकरणासाठी आठ कोटींचा निधी गडकरी रंगायतनमध्ये रंगकर्मींना तसेच प्रेक्षकांना जाणवणाऱ्या गैरसोयींबद्दल तक्रारी आणि सूचना  मुख्यमंत्री  शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात, मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रंगायतनच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात, मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे, गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे देण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  १८ वर्षांनी होणार नुतनीकरण१९७८मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे. गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा,  शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेPrashant Damleप्रशांत दामले