शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर केलेली मैत्री जिवावर बेतली, तरुणीची आत्महत्या, बदनामीच्या धमकीने २० लाख उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 10:26 IST

फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री ठाण्यातील एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राने तिच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे पाहून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठाणे - फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री ठाण्यातील एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राने तिच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे पाहून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.पालघर येथील रहिवासी असलेली २० वर्षांची विद्यार्थिनी तेथील एका महाविद्यालयामध्ये बीकॉमच्या अंतिम वर्षाला शिकत होती. जवळपास तीन वर्षांपूर्वी मुंब्रा येथील अमृतनगरातील अमीन मन्सुरी (वय २२) याच्याशी तिची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. दोघांची मैत्री लवकरच फुलली. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. वर्षभरापूर्वी मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजला. मुलगा आणि मुलगी एकाच धर्माचे, परंतु भिन्न जातींचे आहेत. मुलीच्या कुटुंबीयांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मित्राशी विवाह करण्याची तिची तयारी आहे का, असेही मुलीच्या कुटुंबीयांनी विचारले. त्या वेळी मुलीने लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. मित्राशी असलेले संबंध आपण पूर्णत: बंद करू, असा शब्द तिने कुटुंबीयांना दिला. कुटुंबीयांनी तिच्या शब्दावर विश्वास ठेवून या प्रकरणावर पडदा टाकला.दरम्यान, कुटुंबात निर्माण झालेले वादळ काहीसे शमल्यानंतर दोघांच्या भेटीगाठी पुन्हा सुरू झाल्या. अमीनने या मैत्रीच्या संबंधांचा गैरफायदा घेतला. मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. अमीनशी आपले मैत्रीपूर्ण संबंध कायम असल्याचे मुलीने कुटुंबीयांना सांगितले नव्हते. कुटुंबीयांना माहीत पडले, तर ते रागावतील, अशी मुलीला भीती होती. त्यामुळे ती अमीनच्या धमक्यांना बळी पडली. घाबरून तिने आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. कुटुंबीयांनी तिच्या काही जवळच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता, वस्तुस्थिती समजली. कुटुंबीयांनी रविवारी याप्रकरणी राबोडी पोलिसांकडे तक्रार दिली. अमीन मन्सुरीविरुद्ध खंडणीवसुलीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.आर. सोनोने या प्रकरणाचा तपास करत आहेत.त्रासाला कंटाळून दिला जीवथोडेथोडे करून अमीनने मुलीजवळून २० लाख रुपये उकळले. अमीनची भूक दिवसेंदिवस वाढतच होती. या त्रासाला कंटाळून तिने २६ डिसेंबरला सायंकाळी ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्स येथील सावत्र आईच्या घरात गळफास घेतला. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाFacebookफेसबुक