शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आईवरून शिवी देणे बेतले जीवावर, आरोपी गजाआड : महिलेच्या हत्येचा उलगडा, अनैतिक संबंध असल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:51 IST

मोलमजुरीसाठी ती कल्याणला आली होती. तिचे लग्नही झाले आहे. परंतु, तिचा पती महादेव हा एका खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. लताबाई ही सुनील नावाच्या व्यक्तीबरोबर राहत होती.

कल्याण : वाडेघर परिसरात दगडाने ठेचून हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. लताबाई गवई असे तिचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी ज्ञानेश्वर पाटील (३२) याला सापर्डे गावातून अटक करण्यात आली आहे. आईवरून शिवी दिल्याने लताबाईची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, अशीही माहीती उघड झाली आहे. ज्ञानेश्वर हा एका खाजगी शाळेत बसचालक आहे. तर लताबाई ही मोलमजुरी करत असत.वाडेघर परिसरातील निळकंठ सृष्टीजवळील मोकळ्या मैदानात पत्र्याच्या कंपाउंडजवळ शनिवारी सकाळी १० च्या सुमारास एका महिलेचा दगडाने डोके ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा आरोपीने सोडलेला नव्हता. केवळ त्या महिलेच्या उजव्या हातावर सुनील, असे नाव गोंदलेले असल्याचा एकमेव पुरावा पोलिसांकडे होता. या महिलेची ओळख पटवण्यासाठी तसेच हत्येची माहिती देणाºयास खडकपाडा पोलिसांनी १० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. मात्र, या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेचे पोलीसही करीत होते. महिलेच्या हातावर गोंदविलेल्या नावावरून संबंधित पोलिसांनी तपास सुरू केला. यात त्यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून लताबाई ही सापर्डे गावात पूर्वी राहत असल्याचे समजले. त्यादृष्टीने अधिक तपास करताना तिचे सापर्डे परिसरात राहणाºया ज्ञानेश्वर पाटील याच्यासोबत अनैतिक संबंध होते. पोलिसांनी ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लताबाईची हत्या केल्याची कबुली दिली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाला या हत्येचा उलगडा करण्यात यश आले. गुन्हे शाखेने ज्ञानेश्वरला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.मरण न आल्याने दगडाने ठेचलेशुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर आणि लताबाईची सापर्डे गाव येथील पाटील चायनीज कॉर्नर येथे भेट झाली. त्यानंतर दोघांनी मिळून मद्य प्राशन केले. त्या नशेत त्यांच्यात आपसात वादावादी होऊन शिवीगाळी झाली. यात लताबाईने ज्ञानेश्वरला आईवरून शिवी दिली. याचा प्रचंड राग त्याला आला. दरम्यान घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिला मोटारसायकलवर बसविले आणि वाडेघर गावाच्या निळकंठसृष्टी इमारतीजवळील मोकळ््या जागेत नेले. आईवरून शिवी देणाºया लताबाईला संपवायचेच, असा चंग बांधलेल्या ज्ञानेश्वरने प्रथम तिचा गळा आवळला. परंतु, तिला मरण न आल्याने अखेर तिचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या केली.‘ती’ मूळची बुलडाण्याचीलताबाई बुलडाणा येथील रहिवाशी असून मोलमजुरीसाठी ती कल्याणला आली होती. तिचे लग्नही झाले आहे. परंतु, तिचा पती महादेव हा एका खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. लताबाई ही सुनील नावाच्या व्यक्तीबरोबर राहत होती. त्याचच नाव तिने हातावर गोंदविले आहे. परंतु, त्याचा या हत्येच्या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याची माहिती जॉन यांनी दिली. ज्ञानेश्वर बरोबर तिचे अनैतिक संबंध होते आणि शिवीगाळ केल्याच्या रागातून ज्ञानेश्वरने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे जॉन यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकjailतुरुंग