शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरजवळ स्ट्रॉबेरीच्या शेतीचा ‘अनुभव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:02 IST

शेतकऱ्यांसाठी आदर्श प्रयोग; अनुभव मांजरेकर यांनी अडीच गुंठ्यांत साधली किमया

- पंकज पाटील अंबरनाथ : तालुक्यातील एक प्रयोगशील शेतकरी अनुभव मांजरेकर यांनी त्यांच्या शेतात चक्क स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. बदलापूरजवळील बेंडशीळ गावातील शेतात हा प्रयोग यशस्वी केला आहे. मांजरेकर यांनी महाबळेश्वरची ओळख असलेल्या स्ट्रॉबेरीचे पीक येथील लहरी हवामानातही घेण्याची किमया साधली असून बदलापूरची स्ट्रॉबेरीही नावारूपास आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

थंड हवामानातील फळ म्हणून स्ट्रॉबेरीकडे पाहिले जाते. प्रयोगशील शेतकरी असलेल्या मांजरेकर यांचा कोणत्या मातीत काय पिकेल, याचा चांगला अभ्यास आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या बदलापुरातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येईल, हे त्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले होते. प्रत्यक्षात उत्पादन येणार की नाही, याची शाश्वती कोणालाच वाटत नव्हती; मात्र मांजरेकर यांनी बदलापूरजवळील बेंडशीळ या गावात अवघ्या अडीच गुंठे जागेत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.

त्यांनी स्ट्रॉबेरीचे हे वाण परदेशातून मागवले. हे वाण कोकण पट्ट्यातील वातावरणात तग धरेल, याचा मांजरेकर यांचा अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्या रोपट्यांचे योग्य संगोपन केल्यावर आता या शेतात रसाळ लालबुंद स्ट्रॉबेरी लगडली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांनी भविष्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. या उत्पादनासंदर्भात इतर शेतकऱ्यांनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

थंड हवामानात येणारी स्ट्रॉबेरी आता अंबरनाथ तालुक्यातही यशस्वी झाल्याने ही स्ट्रॉबेरी चर्चेचा विषय ठरत आहे. मांजरेकर यांचा हा प्रयोग सर्वांना नवलाईचा असला, तरी या भागातील पारंपरिक शेतीला नवीन दिशा देणारे ठरत आहे.स्ट्रॉबेरीचे उत्पादन अंबरनाथ तालुक्यात घेतले, असे म्हटले तर इतरांना ते खरे वाटणार नाही. मात्र, आपण सेंद्रिय पद्धतीने योग्य प्रकारे स्ट्रॉबेरीची शेती करू शकतो, हे माझ्या शेतात स्पष्ट झाले आहे. आता इतर शेतकºयांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.- अनुभव मांजरेकर, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रambernathअंबरनाथthaneठाणे