शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोळा वर्षांत कचरा तितकाच,खर्च मात्र ५५० कोटींनी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 00:03 IST

घनकचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची बाब लक्षवेधीच्या माध्यमातून निदर्शनास आणायची होती. परंतु, त्यावर चर्चा करू दिली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला.

ठाणे : घनकचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची बाब लक्षवेधीच्या माध्यमातून निदर्शनास आणायची होती. परंतु, त्यावर चर्चा करू दिली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. घनकचरा विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून, या कारभाराची अ‍ॅण्टी करप्शनमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील आणि राष्टÑवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला.२००२ मध्ये ७५० मेट्रिक टन कचरा उचलला जात होता. २०१८ मध्येही तेवढाच कचरा उचलला जात आहे. २००२ मध्ये यासाठी भांडवली आणि महसुली खर्च हा ४२ कोटींच्या घरात होता, जो आज ६०० कोटींच्या घरात गेला आहे. कचरा वाढलाच नाही तर खर्च वाढला कसा असा आक्षेपही त्यांनी घेतला आहे. २०१३ मध्ये पालिकेने उच्च न्यायालयात माहिती देतांना २०१९ पर्यंत आम्ही कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावू अशी हमी दिली होती. परंतु, एवढ्या वर्षात पालिकेला डायघरचे डम्पिंग ग्राउंड सुरू करता आले नाही, पाच ठिकाणी बायोमिथेनायझेशन प्लान्ट सुरू करण्यात येणार होते. परंतु,त्या जागासुद्धा पालिकेला ताब्यात घेता आलेल्या नाहीत. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन सोसायटीवाल्यांना केले जात आहे. तो वेगळा जमा होत असला, तरी घंटागाडीमध्ये एकत्रच जमा केला जात आहे. तोच कचरा पुढे सीपी तलावाला एकत्र टाकला जात असून पुढे तो दिव्याला पाठविला जात आहे. असे असतांनाही पालिकेच्या माध्यमातून आता सोसायटीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यातही उपविधीचा ठराव मंजूर झाल्यानंतर वाढीव दर असल्याने त्याचा विरोध झाला होता. त्यानंतर एक वर्षापर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली. आता वर्ष संपत आले असतांना पुन्हा अशा प्रकारे नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. हे करीत असतांना आधी पालिकेने सुविधा द्याव्यात, मगच वसुली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मात्र सोमवारी झालेल्या महासभेत अद्याप दर निश्चित केले नसून पालकमंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा होऊन ते निश्चित झाल्यावर तसा प्रस्ताव पुन्हा महासभेच्या पटलावर ठेवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.कामगार कमी, पगार जास्तघंटागाडीवरील कामगारांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीच्या अधिकारात जे कामगार कामावर नाहीत, त्यांचे पगार सुद्धा काढले जात असल्याची बाब समोर आली आहे. तसेच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे, त्याला इतर ठिकाणी काळ्या यादीत टाकले आहे. असे असतांनाही त्याला पालिकेने ठेका दिला आहे. घंटागाडीच्या फेºयांमध्येच दिवसाला पाच ते सात लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.बिगर तांत्रिक कर्मचाºयांचा सहभागघनकचरा विभागात काम करणारे अधिकारी हे टेक्निकल पर्सन असणे अपेक्षित आहे. परंतु,अशोक बुरपुल्ले आणि बालाजी हळदेकर नॉन टेक्निकल पर्सन असूनही ते या विभागात काम करीत आहेत. हळदेकर तर डॉक्टर असून त्यांच्यावर वारंवार कारवाईची मागणी करूनही अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाहीत.कचºयावरच शिवसेनेचे पोषण- आनंद परांजपेघनकचरा व्यवस्थापनामधून पैसा कमावणे हेच शिवसेनेचे धोरण आहे. त्यामुळे ही संघटना कचºयावरच पोसली जात असून त्यांच्यासाठी कचरा हे कुरण असल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला. आजवर टक्केवारीवरच शिवसेनेचे पालपोषण झालेले आहे. त्यामुळे आता ठाणेकरांच्या माथी कचरा कर मारून त्यातून स्वत:चा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे