शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठाणे जिल्ह्यातील 5 पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य? पर्यावरण संचालकांना पडला फ्लेमिंगो अभयारण्य रामसर क्षेत्राचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 10:15 IST

- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : देशातील २.२५ हेक्टरपेक्षा जास्त आकाराच्या दोन लाख एक हजार पाणथळींचे संरक्षण ...

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशातील २.२५ हेक्टरपेक्षा जास्त आकाराच्या दोन लाख एक हजार पाणथळींचे संरक्षण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे  सक्त आदेश असताना त्यांना अव्हेरून महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि हवामान नियंत्रण विभागाच्या संचालकांनी नवी मुंबईतील पाम बीच रोडवरील एका पाणथळीच्या संरक्षणाबाबत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईतील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ ही एकमेव पाणथळीचे क्षेत्र असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पर्यावरण आणि हवामान नियंत्रण विभागाच्या संचालकांचा हा दावा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचित केलेल्या जिल्हाभरातील पाणथळींचे अस्तित्व अमान्य करणारा असल्याचे सांगून याबाबत पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यावरण संचालकांना २० जून २०२२ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार, ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूचित केलेल्या पाणथळींची संख्या १३२ असून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सूचित केलेल्या पाणथळींची संख्या ६  आणि अधिसूचित न केलेल्या पाणथळींची संख्या १२१ इतकी आहे. 

केंद्राने सूचित केलेल्या सहा पाणथळींच्या क्षेत्रांमध्ये ठाणे तालुक्यापर्यावरण संचालकांचा दावा दिशाभूल करणारा नवी मुंबईतील नेरुळ येथील लोटस तलावाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यात ज्वेल ऑफ नवी मुंबई ही एकमेव पाणथळ क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. हा दावा पूर्णत: न्यायालयाची दिशाभूल करणारा असल्याचे नवी मुंबईतील पाच बीच रोडवरील २० हेक्टर एनआरआय पाणथळ आणि १३  हेक्टर टीएस चाणक्य पाणथळींसाठी लढा उभारणारे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल आणि श्रुती अगरवाल यांनी म्हटले आहे. आमच्या लढ्यामुळेच आज नवी मुंबईत येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या वाढली आहे, असेही ते म्हणाले.तील ज्वेल ऑफ नवी मुंबई, मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील मागाली तलाव, कल्याणचा उटणे आणि निळजे तलाव, भिवंडीतील वडपे, वऱ्हाळा तलावाचा समावेश आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सूचित केलेल्या सहा पाणथळींची माहिती २०१७ मध्येच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर; ठाणे खाडी परिसराला जागतिक दर्जाच्या रामसर क्षेत्राचा दर्जा दिला आहे. याचा कोणताही उल्लेख पर्यावरण संचालकांनी आपल्या  प्रतिज्ञापत्रात केलेला नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. कमीत कमी त्यांनी या सर्वांचा उल्लेख तरी त्यात करायला हवा होता. पर्यावरण विभागाच्या अशा धोरणांमुळेच नवी मुंबई, रायगडसह ठाणे जिल्ह्यातील पाणथळी नष्ट हाेत चालल्या आहेत. त्यांचे बिल्डरधार्जिणे धोरण मानवजातीला एक दिवस खूप महागात पडेल.- सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई