शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी रोखण्यासाठी आरोपींचे ‘आदान-प्रदान’; आरोपींवर येणार दडपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 00:03 IST

अप्पर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात प्रत्येक शनिवारी गुन्हेगार आदान-प्रदान संकल्पना राबविण्यास अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली आहे

सचिन सागरे कल्याण : आरोपींवर मानसिक दबाव ठेवणे, तसेच त्यांची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना व्हावी, याकरिता आरोपी आदान-प्रदान योजना अप्पर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.

अप्पर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात प्रत्येक शनिवारी गुन्हेगार आदान-प्रदान संकल्पना राबविण्यास अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली आहे. परिमंडळ ३ आणि परिमंडळ ४ अंतर्गत १६ पोलीस ठाणी येतात. या परिमंडळात असलेल्या चार सहायक पोलीस आयुक्त कार्यालयांत महिन्याच्या प्रत्येक शनिवारी त्यांच्या विभागातील आरोपींना नेले जाते. तिथे उपस्थित असलेल्या पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी-कर्मचारी यांना सहायक पोलीस आयुक्त संबंधित आरोपींच्या माहितीचे आदान-प्रदान करतात. उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांसाठी या आरोपींना त्यांच्याकडे वर्ग करून तपास करणे आणि गुन्हे उघडकीस आणणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या आरोपींना गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहिलेले असते. त्यामुळे, गुन्हा करण्यासाठी हे आरोपी धजावत नाहीत. पोलीस ठाण्यांत दररोज अटक केलेल्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना सर्व अधिकाऱ्यांना दाखवून गुन्ह्यांची माहिती दिली जाते. त्यामुळे आपल्याला सर्व पोलिसांनी पाहिले आहे आणि आपण जर पुन्हा गुन्हा केला तर पकडले जाऊ, अशी आरोपींची मानसिकता होते. यातून गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, हा त्यामागील मूळ उद्देश आहे.शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, आरोपींवर वचक बसावा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. - दत्तात्रेय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त, कल्याण

टॅग्स :Policeपोलिस