शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

परीक्षा हव्यात; ढकलपास नकोच

By admin | Updated: August 28, 2015 00:15 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनावर होणारा अभ्यासाचा ताण कमी करून आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नकोत असा निर्णय घेण्यात आला.

- जान्हवी मोर्ये,  ठाणे शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनावर होणारा अभ्यासाचा ताण कमी करून आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नकोत असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सगळेच विद्यार्थी पुढच्या वर्गात जातात. ढकलपासमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागत नसून तो तिला मारक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शालेय मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते परीक्षाच योग्य आहेत. त्यातून खरा विकास साधला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने ढकलपासचा पुनर्विचार करावा असाही आग्रह संबंधित घटकांनी धरला आहे.डोंबिवलीतील चरु बामा म्हात्रे स्कूलचे मुख्याध्यापक गजानन भोसले यांच्यामते, परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापनच होत नाही. ती घेतली जात नसल्याचा मेसेज पालकांमध्ये असला तरी शिक्षक त्यांच्या पातळीवर परीक्षा घेत असतात. इयत्ता चौथीनंतर पाचवीला त्यांच्यात परीक्षा न घेऊन सुद्धा त्यांचा भाषिक व गणिती विकास किती झाला. याची पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. त्यातून मुलांना आधीच्या इयत्तेत (चौथीत) शिकविलेले कितपत आठवते. याची चाचपणी केली जाते. शिक्षकांसोबत पालकांवरही काही जबाबदारी हवी. परीक्षा नसल्याने आज शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारु न चालणार नाही. विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. विद्यार्थ्यांचा कल शालेय वयातच शिक्षणाच्या माध्यमातून तपासला गेला पाहिजे. त्यामुळे त्यांना करिअर निवडीचा प्रश्न भेडसावणार नाही. मात्र आपल्याकडील शैक्षणिक धोरण ठरविताना शिक्षण तज्ज्ञांना विचारात घेतले जात असले तरी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना विचारात घेतले जात नाही ते घेण्याची गरज आहे. कल्याणच्या बापूराव आघारकर या शाळेच्या मुख्याध्यापिका कमालिनी जीवतोडे यांनी यासंदर्भात सांगितले की, पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नको हा निर्णय बदलण्याची गरज आहे. ती नसेल तर पालकांचे दुर्लक्ष होते. ते त्यांच्या पाल्याकडे लक्ष देत नाहीत. कारण मुलगा पासच होणार आहे. कशाला त्याचा अभ्यास घ्या, त्याला कुठे आहे परीक्षा. प्रत्यक्षात ढकलपास होत गेलेला विद्यार्थी हा नववीच्या वर्गात गेल्यावर त्याला नीट वाचता येत नाही. ही बाब प्रकर्षाने सामोरी आली आहे. विद्यार्थ्यांचे अंगभूत कलागुण जाणून न घेता त्यांना पास केले जात असल्याने ही मुले त्यात मागे पडतात. तसेच नववीला थेट परीक्षेला सामोरे जावे लागते. त्यांची परीक्षेची सवय मोडलेली असते. त्यामुळे थेट नववीत परीक्षेस सामोरे गेल्यावर त्यांच्या मनात ती विषयी अकारण भीती निर्माण होेते. कारण त्यांची लेखन क्षमता विकसीत झालेली नसते.मुख्याध्यापक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, ढकलपासच्या निर्णयात बदल होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय रद्द करावा. विद्यार्थ्यांना परीक्षा हवी. त्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळावे. एखाद्या विद्यार्थ्यांला ७२ टक्के आणि एखाद्याला ७८ टक्के गुण मिळाले. तर दोघांची श्रेणी एकच होते. टक्केवारी असावी. त्यामुळे त्यांच्यातील फरक कळतो. परीक्षाच नसल्याने शालेय वातावरणात एक प्रकारची मरगळ आली आहे. ती शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मारक आहे. शालेय विद्यार्थी नापास झाल्यावर आत्महत्या करीत होते हे समजणे चुकीचे आहे. त्यामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता एखाद दोन आत्महत्या दुर्दैवाने झाले असतील परंतु त्याचा बाऊ केला गेला. त्यातून हा चुकीचा निर्णय घेतला गेला. त्यात बदल होणे अपेक्षित आहे.नेहा कदम ही आघारकर शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकते. तिच्या पालकांनी सांगितले की, परीक्षाच योग्य आहे. दर वर्षी त्या झाल्या पाहिजेत. त्यातून पाल्याची प्रगती कळते. ढकलपासचा निर्णय बदलण्याची नितांत गरज आहे. श्रेणीतून टक्केवारी कळत नाही. टक्केवारीतून कोणत्या विषयात किती प्रगती झाली याचा अंदाज येत नाही. ढकलपास सुरू ठेवली तर पुढील शिक्षण बंद होण्याची भीती आहे. ढकलपासमुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. काही मुलांनी आत्महत्या केलेल्या असल्या तरी त्या प्रत्येका मागे ओव्हरलोडेड अभ्यास हेच कारण असेल असे नाही. इतरही सामाजिक कारणे आहेत. त्यांचा विचार होण्याची गरज आहे.नेहा यांची मुलगी प्रिया हिने सांगितले की, परीक्षा हवी. कारण त्यातून प्रगती कळते. आपले कुठे चुकले आहे. आपण कोणत्या विषयात कमी पडलो. कोणत्या विषयात चांगले आहे. याचा आलेख कळतो. टक्केवारीतून ध्येय ठरविता येते. ढकलपास मधून तसा परिणाम साधत नाही.परीक्षेची सवय नसल्यास पुढील आयुष्य कठीणपालक साक्षी साठे यांच्या मते, परीक्षेमुळे मुले काय शिकतात. ते कळते. एखाद्या विषयात ती मागे पडली तर त्यावर मेहनत घेऊन त्याची तयारी करु न घेता येते. ढकल पासचा निर्णय चुकीचा आहे. तो बदलल्याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागणार नाही. अभ्यास हा झालाच पाहिजे. परीक्षेची सवय नसल्यास आयुष्यातील इतर परिक्षांनाही ही मुले सामोरी जाणार नाही. ढकलपासमुळे कमकुवत पिढी तयार होईल अशी भीती साठे यांनी व्यक्त केली आहे.त्यांच्या दोन्ही मुले आयुष व प्राजक्ता हे शाळेत जातात. आयुष हा सहावीला तर प्राजक्ता ही चौथीला आहे. या दोघांचे म्हणणे आहे की, परीक्षा हवी. ती असेल तर टेन्शन येते. पण अभ्यासही केला जातो. तिची नाहक भीती नको असावी चांगल्या उद्देशाकरीता. परीक्षाच नसल्याने आम्ही काहीच अभ्यास करणार नाही. टक्केवारी असावी. श्रेणीतून आपण कोठे आहोत. हे नक्की कळत नाही.