शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

“मी जे काही बोलले तो माझा अधिकार”; केतकी चितळेनं कोर्टात स्वत: केला युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 12:39 IST

अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) कोर्टात हजर केले तेव्हा तिने बचावासाठी वकील उभे केले नाहीत

ठाणे – अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट लिहिली. या पोस्टनंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकी चितळेविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली होती. आज ठाण्यातील कोर्टात केतकीला हजर केले. तेव्हा कोर्टाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोर्टात नेमकं काय झालं?

अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) कोर्टात हजर केले तेव्हा तिने बचावासाठी वकील उभे केले नाहीत. कोर्टात तिने स्वत:च युक्तिवाद केला. तुमची काही तक्रार आहे का असं कोर्टाने विचारताच ती नाही म्हणाली. तर तुमचे वकील कोणी आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना केतकी म्हणाली, नाही. मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे. मी जे काही पोस्ट केले तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. केतकीने तिची बाजू इंग्लिशमध्ये कोर्टात मांडली.

यावेळी कोर्टात ठाणे क्राईम ब्रांचने केतकीची कोठडी मागितली. केतकीनं केलेली पोस्ट तिने का केली? कुणाच्या सांगण्यावरून केली. या मागे कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे असं सांगत तिच्या कोठडीची मागणी केली. त्यावर केतकी म्हणाली, मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये. राजकीय नेता नसून मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. मी काही मास लिडर नाहीये की माझ्या काही लिहिण्याने कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं तिने सांगितले.

नवी मुंबईच्या कळंबोली पोलीसांनी केतकी चितळेला शनिवारी ताब्यात घेतल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने तिला अटक केली. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात ठाणे पोलीसांनी तिला हजर केले. यावेळी तिने न्यायालयात स्वत: युक्तीवाद केला. तिने आपली बाजू मांडण्यासाठी कोणत्याही वकिलाची नियुक्ती केली नाही. यावेळी केतकीने न्यायालयात आपली बाजू मांडताना , सोशल मिडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा प्रश्न तिने  उपस्थित केला. तिला न्यायालयात हजर करताना पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेSharad Pawarशरद पवारCourtन्यायालय