शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नापास झालो, तरी सारे आयुष्य संपत नाही

By admin | Updated: March 5, 2017 03:08 IST

अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. अपयशाकडेही सकारात्मक वृत्तीने पाहा, असा सल्ला

- जान्हवी मोर्ये,  ठाणेअनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. अपयशाकडेही सकारात्मक वृत्तीने पाहा, असा सल्ला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला.स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात ते बोलत होते. कोणत्याही करिअरचा विचार करताना दिवास्वप्ने पाहू नका. उघड्या डोळ््यांनी स्वप्ने पाहा. त्यामुळे तुम्हाला अपयशही आले, तरी भ्रमनिरास होणार नाही, असे सांगत जयस्वाल म्हणाले, कोणतेही काम करताना निष्ठा असावी. पालकांनीही त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. उलट कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित करावी. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी विसरू नये. असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मराठी शिकलो नसतो तरमी पॅशनेट होऊन करिअर करण्याचे ठरविले होते. आम्ही चार भाऊ होतो. घरातून मला पाठिंबा होता. राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरविले. लोकसेवा या शब्दात लोकांसाठी काम करायचे आहे. हे लक्षात ठेवून त्यात यशस्वी हेण्याचे ध्येय उराशी ठेवले होते. परीक्षा पास झाल्यावर माझे पहिले पोस्ंिटग महाराष्ट्रात झाले. माझ्या गुरुस्थानी असलेल्या एका मित्राने काय कर किंवा काय करु नको यापेक्षा महाराष्ट्रात काम करण्याआधी मराठी शिकण्याचा सल्ला दिला. तो मला कामी आला.त्यावेळी त्याचा सल्ला ऐकला नसता तर माझे काय झाले असते, असा विचारही मला आज मनाला चाटून जातो. पहिल्याच दिवशी मराठीतून पत्रव्यवहार लिहिण्याची वेळ आली. अन्य राज्यात प्रशासकीय व्यवहार इंग्रजीतून केला जातो. महाराष्ट्रात तो मराठीतून केला जातो, याचे समाधान आहे, अशा भावना जयस्वाल यांनी मांडल्या. वाईट वळणाला लागलो होतोयशाकडे वाटचाल करताना जीवनाच्या एका टप्प्यावर तरुणपणी माझेही पाऊल वाकडे पडले होते. एका परीक्षेत गुण कमी मिळाले. तेव्हा मी दारु आणि सिगारेटचा धूर काढत होतो. तेव्हा माझे वडील वारले होते. त्यावेळी आईने मला एकाच शब्दात सुनावले, बाबा असते तर त्यांना हे पाहून काय वाटले असते? ते शब्द काळजाला घर पाडणारे ठरले. तेव्हाच ठरवले, दारु आणि सिगारेटचा धूर पुन्हा काढायचा नाही आणि माझ्या करिअरची गाडी मूळ ट्रॅकवर आली. त्याचे श्रेय माझ्या निरक्षर आईला जाते. शिकलेलीच माणसे वळणावर आणतात असे नाही... हे सांगताना जयस्वाल भावनावश झाले होते. नोकरी राजासारखी करा!नोकरी राजासारखी करा. चांगले काम देव पाहत असतो. त्याच्या दरबारात चांगल्याची नोंद होत असते.कोणाला फसवू नका. स्वत:ला फसवून तुम्ही आनंदी राहू शकत नाही. कोणतेही काम करताना चांगला माणूस होणे गरजेचे आहे, याकडे जयस्वाल यांनी लक्ष वेधले. कठोर मेहनत घेऊन जे यश मिळते, त्याच्या आनंदाचा पारावर राहत नाही. तो आनंद कोणत्याही तराजूने न तोलण्यासारखा असतो. खरा आनंद असतो, असे त्यांनी सांगितले.बदलीसाठी घेतला होता पंगा : चंद्रपूरला माझे पोस्ंिटग झाले. त्यावेळी मी अनेकांशी पंगा घेतला होता. पंगा घेतला, की सरकारकडून माझी लगेच बदली केली जाईल, अशी माझी धारणा होती. पण माझे चांगले काम पाहून मला साडेतीन वर्षे चंद्रपूरमध्ये ठेवले. त्यानंतर मात्र मी कुटुंबीयांचा विचार करून बदली करून घेतली, असा किस्सा त्यांनी सांगितला.