शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या निर्णयानंतरही कल्याण डोंबिवलीतील 400 हॉटेल, बार रेस्टॉरंट बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 18:54 IST

Dombivali News : ७ ऐवजी रात्री ११ पर्यन्त वेळ वाढवून हवी, कल्याण, डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनची मागणी 

- अनिकेत घमंडीडोंबिवली: सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हॉटेल उघडी ठेऊन आम्हाला परवडणारे नाही, आधीच या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे, संध्यकाळाची वेळ रात्री १०.३० पर्यन्त वाढवून द्यावी, अन्यथा व्यवसाय सुरू करून काहीही फायदा नाही. जो पर्यंत वेळ वाढवून मिळत नाही तो पर्यंत हॉटेल बंद ठेवलेली बरी असा पवित्रा कल्याण, डोंबिवलीमधील हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सोमवारपासून हॉटेल व्यवसायिकांनासुद्धा त्यांचे व्यवस्याय कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यात यावे असे जाहीर करण्यात आले होते, परंतु वेळेचे समीकरण जुळत नसल्याने हॉटेल बंद ठेवून पार्सल सेवा सुरू ठेवण्यावर व्यावसायिकांनी भर दिला. त्यामुळे या दोन्ही शहरातील सुमारे ४००हुन अधिक हॉटेल, बार, छोटे रेस्टोरंट, स्नॅक्स बार आदी बंद असल्याचे निदर्शनास आले.ग्राहकांनी उत्सुकतेपोटी विचारणा केली खरी,पण त्यांनाही अजून मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे व्याकसायिकांनी सांगितले. त्या असोसिएनशनचे अध्यक्ष अजित शेट्टी(डोंबिवली), प्रवीण शेट्टी(कल्याण) यांनी सांगितले की, मुळात हॉटेल दोन शिफ्ट मध्ये चालतात. त्यात सकाळी ९ ते संध्याकाळी ७ अशा विचित्र वेळेत कोणतीही शिफ्ट पूर्ण होत नाही, त्यामुळे कामगारांना कामावर तरी कसे बोलवावे. तसेच हॉटेल, बार हे व्यवसाय संध्याकाळी ७ नंतर खऱ्या अर्थाने चालू होतात, त्यामुळे ७ नंतर बंद करून व्यवसाय सुरू करण्याला काही अर्थ नाही.नुकसान अधिच झाले आहे त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे केडीएसमी आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांची लवकरच भेट घेऊन मुंबईच्या धर्तीवर इथं देखील व्यवसायाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र तयार करण्यात येत आहे, या व्यवसायासमोरच्या अडचणींबाबत देखील त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे शेट्टी म्हणाले. पण ठोस निर्णय होत नाही तो पर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात येणार असून आतासारखी पार्सल सेवा सुरू राहील या निर्णयावर व्यावसायिक ठाम असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलdombivaliडोंबिवली