शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

स्वातंत्र्यानंतर पाऊणशे वर्षांतही जिल्ह्यातील २३ गावपाड्यांना ना रस्ता, ना वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विविध विकासात्मक घडामोडींत आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे म्हणजे ७५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : विविध विकासात्मक घडामोडींत आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे म्हणजे ७५ वर्षांत रस्ते, वीज, पाणी, आदी अत्यावश्यक सेवांचा आजही अभाव आहे. आजही शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांतील तब्बल २३ गावांत वीज या अत्यावश्यक सेवेसह रस्ते नसून, ही गावे कोणत्याही जवळच्या रस्त्यांना जोडली नसल्याचे आढळून आले आहे. येथील रहिवाशांना आजही जंगलातील पायवाटांमधून रस्ता काढून शहर गाठावे लागत आहे.

ठाणे जिल्हा चार हजार चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेला आहे. यात ३१ शहरांसह ४३० ग्रामपंचायती आहेत. देशात सर्वाधिक सहा महापालिकांचा जिल्हा. यात दोन नगरपरिषदा, दोन नगरपंचायती, आदी स्थानिक स्वराज्य संस्था विकासात्मक दृष्टीने जिल्हा आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम राज्यातील सत्ता, देशाच्या राजकारणाला, सत्तेला हादरा देणारा आहे. मात्र, आज या जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी लोकवस्तीचे गावपाडे रस्त्यांसह वीज, पाणीपुरवठ्याच्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित आहेत.

या गावपाड्यांना वीज, रस्ते व काही ठिकाणी पाण्याच्या अभावासह आरोग्य आणि वाहतूक सेवा तर या गावकऱ्यांच्या नशिबी आजपर्यंत नाही. देशाच्या ७५ वर्षांतील स्वातंत्र्यानंतर या सेवा व गरजा गावकरी, रहिवाशांचे स्वप्नच ठरल्या ‌‌‌‌‌असल्याचे उघडकीस आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह महानगराला लागून ठाणे जिल्हा आहे. ऐतिहासिक कालखंडापासून ब्रिटिशांच्या सत्ताविस्ताराचा केंद्रबिंदू आणि आजही देशाच्या आणि राज्याच्या सत्तेवर अंकुश असलेल्या या जिल्ह्यातील गावपाडे त्यांना अत्यावश्यक सेवा व विकासाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या रस्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

-------