शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इफेड्रिन प्रकरण :ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त होणार, अंधेरी येथे तीन प्रशस्त सदनिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:16 IST

२००० कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने फरार घोषित केलेली ममता केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे.

ठाणे : २००० कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायालयाने फरार घोषित केलेली ममता केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे.१३ एप्रिल २०१६ रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून १२ लाख रुपयांचे इफेड्रिन जप्त केले होते. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून २ हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देशविदेशात तस्करी करणाºया रॅकेटचा भंडाफोड केला होता. अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हादेखील या प्रकरणात आरोपी आहे. एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये इफेड्रिनचे उत्पादन व्हायचे. कंपनीच्या भागीदारांच्या मदतीने हे इफेड्रिन केनिया येथे निर्यात केल्यानंतर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे अमलीपदार्थात रूपांतर केले जायचे. चौकशीसाठी पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठावठिकाणा मिळत नसल्याने तिला फरार घोषित करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने तिला फरार घोषित केल्यानंतर पोलिसांनी तिच्या अंधेरी येथील निवासस्थानी नोटीस बजावली.या नोटीसला तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, पुढील पायरी म्हणून पोलिसांनी तिची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी न्यायालयास मागितली होती. अमलीपदार्थविरोधी विशेष न्यायालयाचे न्या. एच.एम. पटवर्धन यांच्यापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या वेळी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पोलिसांची विनंती ग्राह्य धरून ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिली.रेड कॉर्नर नोटीससाठी पाठपुरावाममताविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून केंद्रीय गुप्तचर खात्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ती केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे. रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर सर्व विमानतळांना संबंधित आरोपीबाबत सतर्क केले जाते. आरोपी कोणत्याही विमानतळावर आढळल्यास संबंधित पोलीस यंत्रणेला त्याबाबत कळवले जाते. रेड कॉर्नर नोटीससाठी आरोपपत्र दाखल करणे अनिवार्य असते. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्याने आता ममताविरुद्ध रेड कॉर्नर बजावण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.विक्की गोस्वामीच्या नावे मालमत्ता नाहीममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी निबंधक कार्यालयाकडून मागवली होती. त्यानुसार, विक्की गोस्वामीच्या स्वत:च्या नावावर कोणतीही मालमत्ता नसल्याची माहिती निबंधक कार्यालयाने दिली.ममता मुकुंद कुलकर्णीच्या नावे अंधेरीतील वर्सोवा येथे पाच मार्गांवर स्काय अँकरेज सोसायटीमध्ये पहिल्या, दुसºया आणि सातव्या माळ्यावर १०१, २०१ आणि ७०१ क्रमांकांच्या तीन प्रशस्त सदनिका आहेत. न्यायालयाने हिरवी झेंडी दिल्याने या सदनिका जप्त करण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा