शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रणरणत्या उन्हातही मतदानाचा उत्साह, काही भागांत बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी

By नितीन पंडित | Updated: May 21, 2024 14:09 IST

...मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी पूर्व, पश्चिम, ग्रामीण,शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात नागरिकांनी उत्साहात मतदान केले. रणरणत्या उन्हातदेखील नागरिकांनी लांबच लांब रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्याने अनेक मतदारांचा हिरमोड झाला. काही भागांत बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीवरून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे संतप्त झाले. मागील निवडणुकीत भिवंडीत ५३.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४९.४३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे भिवंडीत मागील वेळेपेक्षा जास्त मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत.भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, भाजपचे कपिल पाटील व अपक्ष नीलेश सांबरे त्यांच्यात लढत होती. पहिल्या दोन तासांत अवघे ४.८६ टक्के मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.यादीतून नावे गायबभिवंडी मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे यादीतून गायब असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. गेली ३० वर्षे मतदान करीत होतो अचानक नावे कशी गायब झाली, असा सवाल नावे गायब झालेले शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, महिलाांनी केला.

बोगस मतदानाचा आरोपउमेदवार कपिल पाटील यांनी शहरातील बाळा कंपाऊंड येथील मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला. ईदगा येथे पाटील पोहोचले असता काही ठिकाणी रसायनांचा वापर करून बोटावरील शाई पुसून लोक मतदान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाटील व त्यांच्या समर्थकांनी याला आक्षेप घेताच नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. पाटील यांचा हा आक्षेप विरोधी उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी फेटाळला व पाटील यांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला.तृतीयपंथींचे मतदानभिवंडी परिसरात तृतीयपंथी व देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान