शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीचा महापूर अन् भक्तांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 03:00 IST

सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे :सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू आहे. घरोघरी साफसफाईपासून खरेदीची लगबग सुरू असून घरातील सर्व मंडळी कामाला लागली आहेत. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह सोसायट्यांमध्येही रविवारी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ काहीशी जास्तच असून त्यामुळे खिसा चाचपतच गणेशभक्तांकडून खरेदी केली जात आहे.गणेशोत्सव जवळ आला आहे. बाप्पांच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात लाडक्या गणरायाचे स्वागत केले जाणार आहे. घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. खरेदीसाठी ठाण्यातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. इतर दिवशी नोकरीमुळे महत्त्वाची खरेदी करणे अशक्य असल्याने गणेशभक्तांनी सुटीच्या दिवशीचा मुहूर्त साधला. शनिवार-रविवारी सुटी असल्याने हे दोन दिवस ठाणेकरांसाठी खरेदीचे ठरले. या दिवशी ठाणेकरांनी भरभरून खरेदी केली. मोदकांची आणि फुलांची खरेदी ही शेवटच्या यादीत ठेवल्याने इतर खरेदी यादिवशी करण्यावर ठाणेकरांनी भर दिला. त्यामुळे या दोन्ही दिवशी गर्दीचा महापूर आणि भक्तांचा उत्साह दिसून आला.जांभळी मार्केट सकाळपासूनच गर्दीने ओसंडून वाहत असल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होती. एरव्ही, दुपारी खरेदी करण्याकडे ठाणेकरांचा फारसा कल नसतो. परंतु, या दोन्ही दिवशी उलट परिस्थिती दिसून आली. सकाळी ६ वाजल्यापासून ठाणेकरांनी पावले बाजारपेठेकडे वळवली असल्याने उत्साहात, परंतु खचाखच भरलेल्या गर्दीत ठाणेकरांना खरेदी करावी लागली. मखरं, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, गणेशमूर्ती, केळीची पानं, खायची पानं, माव्याचे मोदक, लायटिंग, विविध प्रकारांची फुले आदींनी बाजारपेठ सजली होती. गणपती आगमनापर्यंत असेच चित्र दिसेल, असे विक्रेत्यांनी सांगितले. सण, उत्सवाच्या निमित्ताने चांगली कमाई होत असल्याने ग्रामीण भागातील महिलाही रस्त्याच्या कडेला विविध वस्तू, भाजी, फुलांची विक्री करताना नजरेस पडत होत्या. ठाणे पूर्व, राममारुती रोड, नौपाडा, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड यासारख्या ठिकाणीही छोटीमोठी खरेदी होत होती.>चायनाची लायटिंगचायनामेड लायटिंगचा तोरा या उत्सवात पाहायला मिळत आहे. १५० रु पयांपासून पुढे याची किंमत आहे. लायटिंगची खरेदी शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात झाली. यात गोल्डन रंगाचा मुलामा असलेली लायटिंग लक्ष वेधून घेणारी होती. लायटिंगवर चालणारी समईदेखील नजरेस पडत होती.>पूजेचे साहित्यमहात्मा फुले मार्केट येथे असलेल्या छोट्या गल्लीमध्ये पूजेचे साहित्य मिळते. तिला पूजागल्ली म्हणतात. याठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. घंटी, टाळ, पूजेचे ताट, चौरंग, उपरणं, समई अशा अनेक साहित्यांची खरेदी केली जात होती. बाजारपेठेच्या कडेलगत काजू-मोदक, प्रसादासाठी लागणाऱ्या फुटाण्यांची विक्री करताना लहान विक्रेते टोपली किंवा छोटे बाकडे मांडून बसल्याचे दिसून येत होते. केळीची पानेही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. ८० रु पये जुडी याप्रमाणे ही पाने विकली जात होती. ही खरेदी पुढील १० दिवस चालेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.मावा मोदकांचे दर वाढलेएकीकडे उकडीच्या मोदकांना महागाईची झळ पोहोचली असताना दुसरीकडे मावा मोदकांचेही दर वधारले आहेत. या मोदकांची किंमत किलोमागे २० रुपयांनी वाढले आहेत. इकोफ्रेण्डली मखरांप्रमाणे फुलांचे मखरही भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. विविध रंगांचे हे मखर कमान, डोली, मंदिर, कळस, देव्हारा, मोर, चौकोन, घुमट अशा विविध प्रकारांत विक्रीसाठी आले आहेत. ५०० पासून तीन हजार रुपयांपर्यंत मखर उपलब्ध आहेत.>यंदा मोदकांमध्ये नवीन फ्युजनबाप्पांच्या आवडता नैवेद्य म्हणून ओळखल्या जाणाºया मोदकांत नवीन फ्युजन विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हा नैवेद्य अधिकच आकर्षक ठरणार आहे. उकडीच्या मोदकांप्रमाणे मावा मोदकांची, कडक बुंदीच्या मोदकांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. यंदा नव्याने चिकू आणि किवीचे मोदक आले असून हे मोदक दोन दिवस टिकणारे असल्याचे केदार जोशी यांनी सांगितले. हे मोदक ७०० रुपये किलोने उपलब्ध आहेत. नव्याने बनवण्यात येणारा हापूस आंबा, मावा मोदकाचा तोराही पाहायला मिळणार आहे. हापूस आंब्यांच्या रसामधून पाणी काढून उरलेल्या पल्पपासून हा मोदक बनवण्यात येणार असून तो १५ दिवस टिकेल, अशी खात्री जोशी यांनी दिली. या मोदकामुळे आंबा खाल्ल्याचा फील येईल, असेही ते म्हणाले. काजूपासून बनवलेले मोदकही यावेळी भक्तांसाठी उपलब्ध आहेत. यात पिस्ता काजू, मिक्स ड्रायफ्रूट काजू, अंजीर काजू असे विविध चवीचे मोदक असतील. ११ किलो, नऊ किलोंचे कडक बुंदीचे मोदक बनवण्यात आले आहेत. यात ११ किलोंचा मोदक ३१०० रुपये, तर नऊ किलोंचा मोदक २१०० रु पये याप्रमाणे दर आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून या मोदकांची खरेदी केली जाते. सव्वा किलो मावा मोदक ७०० रुपये दराने उपलब्ध आहे. पारंपरिक जायफळ मावा मोदक, कंदी मोदक, केशर मोदक, बटरस्कॉच मोदक, मलाई मोदकामध्ये स्ट्रॉबेरी मोदक, पिस्ता मोदक, अंजीर मोदक हे विविध प्रकार आहेत. कडक बुंदीचा कलशाच्या आकारातील मोदकही लक्ष वेधून घेणार आहे. हा मोदक ३०० रुपयांप्रमाणे उपलब्ध आहे.>सुगंधी अगरबत्ती, धूपस्टीकला मागणीअगरबत्ती, धूपस्टीक, जम्बो अगरबत्तीला गणेशोत्सवात भरपूर मागणी असल्याचे नमिता करंदीकर यांनी सांगितले. सुगंधित अगरबत्ती घेण्याकडे भक्तांचा कल असल्याचे त्या म्हणाल्या. अगरबत्तींमध्ये अश्वमेध, काश्मिरी कस्तुरी, जाफरान, आगरवूड, चंदनमाला, नागचंपा, शाही अंबर यांना जास्त पसंती आहे. जम्बो अगरबत्तीमध्ये रिया, अंबर ऊद, गोल्डन फ्लोरा, गोल्ड टिष्ट्वस्ट, पंचरत्न हे प्रकार आहेत. रिंग ओ रिंग ही अगरबत्ती आठ तास राहते, असे करंदीकर म्हणाल्या. धूपस्टीकमध्ये ऊद हा नवीन प्रकार आला असून भक्तांच्या पसंतीस उतरत आहे. गुगल कॅण्डी स्टीक, फ्रेश संदल, गोल्डन सॅफरॉन, तर धूपकपमध्ये गोल्डन लीफ, मस्क अंबर हे प्रकार आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव