शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माध्यमाच्या शाळेतूनच बुद्धीला मिळते चालना

By admin | Updated: May 12, 2017 01:28 IST

आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी मेंदूचा वापर केला जातो. बुद्धीला चालना देणारे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून मिळते.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी मेंदूचा वापर केला जातो. बुद्धीला चालना देणारे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून मिळते. हे शिक्षण हृदयापासून दिले जाते. त्यामुळे ते विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या तऱ्हेने पोहोचते. मराठी शाळांची संख्या वाढली पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त के ले.राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ सोमवारी दत्तनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात झाला. या वेळी डॉ. देशमुख बोलत होत्या. शाळेची वेबसाइट व आर्यभट्ट गणितीय प्रयोग शाळेचे उद्घाटनही या वेळी झाले. याप्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाल्या, की स्वामी विवेकानंद ही शाळा चार मुलांपासून सुरू झाली. अनेक शिक्षकांनी योगदान दिले म्हणूनच इतके विद्यार्थी आपण घडवू शकलो. या शाळेत ३० वर्षे शिकवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. इतकी वर्षे या व्यवसायात राहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसणे सोपे नाही. कीर्तन हा माझ्या आवडीचा विषय आहे. कीर्तन आणि प्रवचनातून अनेक गोष्टी शिकता येतात. जे शिक्षण शाळेतून मिळत नाही, ते कीर्तनातून मिळते. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे मनापासून व विद्यार्थ्यांच्या प्रतिमेला वाव देणारे आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत कधी मागे राहणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.रांगोळीची प्रथा आता कमी होऊ लागली आहे. रांगोळीला आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. एका मैत्रिणीच्या घरी गेल्यावर तिने शेगडीच्या भोवतीने रांगोळी काढली होती. त्याबाबत विचारला असता त्यांनी सांगितले की, रांगोळी काढल्याने शेगडी स्वच्छ होते. असे चांगले विचार मराठी शाळा देतात. हल्ली रांगोळी कुठे दिसत नाही. रांगोळीची जागा आता पेंटिंगने घेतली आहे. विवेकानंदांनी अनेक आध्यात्मिक संदेश दिले. त्या मार्गावर तुम्ही चालत आहात. त्यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगतीच होणार आहे. शाळा मोठी करूया. राष्ट्राला पुढे आणूया. राष्ट्र हे युवकांवर अवलंबून असतात. विद्यार्थ्यांनी प्रगती करताना माणुसकी विसरू नका, असा संदेश ही त्यांनी दिला. राज्यमंत्री चव्हाण म्हणाले, शाळा हे आदर्श नागरिक घडवणारी संस्था आहे. त्यागाच्या भावनेतून अनेकांनी मेहनत घेतल्याने संस्था नावारूपास आली. विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच सावरकरांचे विचार व विवेकानंदाची शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाते. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार लैकिक मिळवला आहे. डोंबिवलीच्या मातीतही अनेक रत्ने जन्मला आली आहेत. त्यामुळे डोंबिवलीचे नाव झाले आहे. शाळेतील शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी यांचे योगदान आहे. त्यामुळे चांगले क्रीडापटू, डॉक्टर या देशाला मिळाले आहेत. मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. पण येथील मराठी शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत. कारण येथील शिक्षक व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहे, म्हणूनच हे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले. सुलभा डोंगरे यांनी पुढील वर्षभर विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुलकर्णी व सूत्रसंचालन सुनील पांचाळ यांनी केले. माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, नगरसेवक राजेश मोरे, संदीप पुराणिक, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, अलका मुतालिक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.