शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:28 IST

नौदलाची गोपनीय माहिती देण्याच्या बदल्यात पाकिस्तानातून मिळाली मोठी रक्कम

ठाणे : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपचे आणखी एक खळबळजनक प्रकरण आता समोर आले आहे. यामध्ये भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या मुंबई डॉकयार्डमधील अभियंता तंत्रज्ञ रविकुमार वर्मा (वय ३५, रा. कळवा, ठाणे) याला राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडून गुरुवारी अटक झाली आहे. त्याच्या संपर्कातील दोघांविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियमाखाली (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहिती पुरविल्यानंतर पाकिस्तानातून मोठी रक्कमही त्याच्या बैंक खात्यात जमा झाल्याची माहितीही समोर आली आहे.

मुंबईतील डॉकयार्ड येथील एक कर्मचारी पाकिस्तानी इन्टेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) संपर्कात असून, त्याने भारत सरकारने प्रतिबंधित केलेली गोपनीय व संवेदनशील माहिती त्यांना पुरविल्याची एटीएसच्या मुंबई पथकाला मिळाली.

त्या आधारे एटीएसच्या पथकाने या कर्मचाऱ्याची चौकशी केली. त्यामध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकद्वारे एका पीआयओशी त्याची ओळख झाल्याचे स्पष्ट झाले.

अन्य दोघेही जेरबंद

नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत याच पीआयओला व्हॉटसअॅपद्वारे भारताने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविल्याचे उघड झाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर वर्मा याला २८ मे रोजी कळव्यातून अटक करण्यात आली. सखोल चौकशीनंतर त्याच्याच संपर्कातील अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

डॉकयार्डमध्ये चार वर्षांपासून अभियंता

वर्मा हा डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता तंत्रज्ञ म्हणून ठेकेदारीवर गेल्या पाच वर्षांपासून नोकरी करीत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात आला. तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी मैत्री केली आणि भारतीय नौदलातील महत्त्वाची गुपिते व्हॉटसअॅपद्वारे काढून घेतली. तो अविवाहित असून, ठाण्याच्या कळव्यातील स्वतःच्या मालकीच्या घरात वास्तव्याला होता. त्याने दिलेल्या माहितीनंतर पाकिस्तानच्या त्याच्या मैत्रिणीने त्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केल्याची माहिती चौकशीत उघड झाली. त्याला नेमकी किती आणि कोणाकडून ही रक्कम मिळाली, त्याने आणखी कोणती माहिती दिली, या सर्व बाबींचा तपास एटीएसकडून करण्यात येत आहे.

यापूर्वीचे पाकिस्तानी हनी ट्रॅप

१२ मार्च २०२४ -प्रतिबंधित क्षेत्रांबद्दल गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा कंत्राटी कामगार कल्पेश बायकर याला अटक करण्यात आली. पाकिस्तानी एजंटने नोव्हेंबर २०२१ ते मे २०२३ दरम्यान फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती मागवली. त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेतले होते. तो २०१४ पासून डॉकयार्डमध्ये काम करत होता.

१२ डिसेंबर २०२३: गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) एजंट्सना पुरवून त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी तरुण गौरव पाटील (२३) याला अटक केली. पाकिस्तानच्या हस्तकांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याला जाळ्यात ओढले होते. पाकिस्तानी एजंटांनी त्याला ते जहाजे डिझाइन करणाऱ्या एका कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवले होते. 

ऑक्टोबर २०२० : एटीएसने नाशिकजवळील संरक्षण क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सुविधेतील सहायक पर्यवेक्षक दीपक शिरसाठ यांना आयएसआय हँडलरला भारतीय लढाऊ विमानांबद्दल गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली. साहित्याची तपासणी करणाऱ्या शिरसाठ यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा संशय होता. 

४ मे २०२३ : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याप्रकरणी एटीएसने डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

टॅग्स :thaneठाणेPakistanपाकिस्तानMumbaiमुंबई