शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मे अखेर १०० टक्के नाल्यांची सफाई होणार; महापौरांचा नालेसफाई पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:44 IST

सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून महापौर नरेश म्हस्के यांच्यासह उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यासह स्थानिक नगरसेवक या पाहणी दौऱ्यात हजर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : शहरातील नाल्यांची सफाई योग्य पध्दतीने सुरु असून येत्या ३१ मे र्पयत नाल्यांची सफाई १०० टक्के होणार असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. सध्या नाल्यांची सफाई ६० ते ७० टक्के झाली असून नाले सफाई योग्य पध्दतीने व्हावी पावसाळ्यात नाल्यातील पाणी न तुंबण्यासाठी जी पाणी साठण्याची ठिकाणो आहेत, त्याठिकाणी टीम कार्यरत केल्या जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.           सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून महापौर नरेश म्हस्के यांच्यासह उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यासह स्थानिक नगरसेवक या पाहणी दौऱ्यात हजर होते. यावेळी त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालय, पासपोर्ट ऑफीस, थिराणी शाळेजवळ, लोढा, ऋतुपार्क, एसटी वर्कशॉप आणि वंदना बसस्टॉप येथील नाले सफासफाईची पाहणी त्यांनी केली. यावेळी नालेसफाईची कामे समाधानकारक झाली असल्याचा दावा म्हस्के यांनी केला आहे. सध्याच्या पाहणीत नालेसफाईची कामे ही ६० ते ७० टक्के पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर येत्या ३१ मे अखेर र्पयत नालेसफाईची कामे 1क्क् टक्के पूर्ण केली जातील असाही दावा त्यांनी यावेळी केला.या नालेसफाईच्या अनुषंगाने पालिका अधिकारी आणि संबधींत ठेकेदारांना काही महत्वाच्या सुचना यावेळी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी नालेसफाई करतो, त्या नाल्यांना जी गटारे मिळतात ते देखील साफ होणो गरेजचे आहे, त्याठिकाणी देखील कचरा काढला जात आहे. तसेच कचरा उचलण्यासाठी नाल्यांची ज्या काही भिंती तोडल्या जात आहेत, त्या पुन्हा उभारण्याचेही संबधींतांना सांगण्यात आले आहे.  तसेच नाल्यातील बाहेर काढण्यात आलेला कचरा हा पूर्णपणो उचलण्यात यावा तसचे तेथील रस्ता स्वच्छ धुवून घ्यावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच मागील वर्षीचा अनुभव पाहता पाणी कुठे तुंबेल, साचेल याची देखील माहिती घेण्यात आलेली आहे. तसेच यासाठी पावसाळ्यात पुन्हा एकदा दौरा केला जाणार आहे. तसेच पावसाळ्यात नाल्यातून अनेक वस्तु वाहून येत असतात. त्यामुळे प्रवाह अडला जातो. त्यानुसार कुठे हा प्रवाह अडला जातो, याची देखील माहिती घेण्यात आलेली आहे. त्याठिकाणी विशेष टिम नियुक्त केली जाणार असून त्यांच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका