शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

खंबाळपाडा आगारातील कचरागाड्या अखेर हटणार

By admin | Updated: May 4, 2017 05:42 IST

केडीएमसीचे दैनावस्थेतील खंबाळपाडा येथील बसआगार विकसित करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे या

कल्याण : केडीएमसीचे दैनावस्थेतील खंबाळपाडा येथील बसआगार विकसित करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे या आगारातील कचऱ्याच्या गाड्या हटवल्या जाणार आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत परिवहन समितीचे सभापती संजय पावशे यांनी उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले होते. त्यात बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी यांनी खंबाळपाडा आगाराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. केडीएमटी प्रशासनाचे आजवर तिन्ही आगारांकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दलदलीची आगारे आणि मोडकळीस आलेली दैनावस्थेतील कार्यालये, असे चित्र येथे सर्रासपणे दिसत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘आॅन दी स्पॉट’द्वारे या एकंदरीतच वास्तवतेला वाचा फोडली होती. त्यानंतर, केडीएमटी उपक्रमाला जाग आली. यात वसंत व्हॅली आगाराचा भूखंड विकसित करणे, खंबाळपाडा आगारात अंतर्गत सुधारणा करणे, याचबरोबर गणेशघाट आगारात लाद्या बसवणे, गटारासाठी व बस थांबण्यासाठी स्टॉपरची व्यवस्था करणे, फर्निचर आणि डांबरीकरण करणे, आदी कामांचे साडेचार कोटींचे प्रस्ताव आॅक्टोबरमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेने मंजूर केले आहेत. खंबाळपाडा आगार कार्यान्वित करण्यासंदर्भात वारंवार ठराव करूनही त्याला मुहूर्त मिळालेला नव्हता. अखेर, उशिरा का होईना, या आगाराच्या विकासालाही प्रारंभ झाला आहे. परंतु, याठिकाणी कचऱ्याच्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या गाड्या तत्काळ हटवा, असे परिवहन सदस्यांकडून सातत्याने प्रशासनाला सांगूनही याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या बस ठेवायच्या कुठे, असा सवाल उपस्थित झाला आहे. वेळप्रसंगी मेट्रो मॉल परिसराचा आधार घ्यावा लागला आहे. खंबाळपाडा आगाराच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने या आगाराला एकप्रकारे डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, परिवहनचे सभापती पावशे यांनी उपक्रमाचे व्यवस्थापक देविदास टेकाळे आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खंबाळपाडा आगारातील कचऱ्याच्या गाड्या हलवून तेथे डोंबिवली शहरासाठी बस सोडा, असे आदेश दिले. त्यात आगाराच्या विकासाचे काम सुरू असून कचरा गाड्यांमुळे त्या कामांना अडथळा निर्माण होत असल्याकडेही पावशे यांनी लक्ष वेधले. अखेर, त्यानुसार आगारातील कचऱ्याच्या गाड्या हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)शेजारील भूखंडावर हलवणार गाड्याखंबाळपाडा आगारात कल्याण पूर्वेकडील तीन प्रभागांमध्ये कचरा उचलणाऱ्या ४५, तर डोंबिवलीच्या चार प्रभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या ६० गाड्या उभ्या केल्या जात आहेत. या आगारातूनच त्या गाड्या सुटत असत. आगाराला लागूनच असलेल्या भूखंडावर या गाड्या हलवण्याचा निर्णय घेतला गेला असलातरी ती जागा अपुरी पडणार असल्याने गाड्यांच्या पार्किंगचा तिढा ‘जैसे थे’ राहण्याची दाट शक्यता आहे.