शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरच्या मुख्यमार्गावरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 20:26 IST

मेट्रोच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असताना फेरीवाल्यांच्या हातगाड्यांनी कोंडीत मोठी भर पडत आहे.

मीरारोड: महापालिकेने विना निवीदा फेरीवाले हटवण्यासाठी लाखो रुपयांचे कंत्राट दिले असताना शहराच्या मुख्य अशा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर सर्रास फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. आधीच मेट्रोच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असताना फेरीवाल्यांच्या हातगाड्यांनी कोंडीत मोठी भर पडत आहे.महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाने निवीदा न मागवताच शहरातील मुख्य १३ रस्त्यां वरील फेरीवाले हटवण्यासाठी विना निवीदा दरमहा तब्बल २० लाखांचे कंत्राट एका खाजगी ठेकेदारास दिले आहे. सदर ठेकेदारा कडुन शहरातील रस्ते फेरीवाला मुक्त झालेले नसताना आतपर्यंत लाखो रुपयांचे देयक पालिकेने केले आहे. तसेच ठेकेदारा कडील कर्मचारायांची व वाहनांची हजेरी तसेच फेरीवाल्यांच्या कारवाईच्या नोंदी मध्ये मोठा घोटाळा असल्याचे आरोप होत आहेत. परंतु आयुक्तांसह प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा मात्र ठेकेदारास पाठीशी घालत आहेत.आधीच शहरातील मुख्य रस्त्यां वरील अतिक्रमणाने सामान्य नागरीक आणि वाहन चालक त्रासले आहेत. त्यातच काशिमीरा ते सावरकर चौक पर्यंतच्या मुख्य अशा शिवाजी महाराज मार्गावर फेरीवाले तसेच पार्किंगला मनाई असताना देखील सर्रास फेरीवाले, हातगाडीवाले, पार्किंग, गाड्यांचे शोरुम आदीचे अतिक्रमण कायम आहे. त्यावर ठेकेदार, पालिका व वाहतुक पोलीसां कडुन ठोस कारवाई होत नाही.त्यातच या मुख्य मार्गावर आधी पासुनच मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याने प्रमुख नाक्यांवरची कोंडी नित्याचीच आहे. आता मेट्रोचे काम सुरु झाल्याने आधीच होणारी वाहतुकीची कोंडी अतिशय जाचक ठरु लागली आहे. या मार्गावरील श्रीकांत जिचकार चौक (एसके स्टोन) जवळ भररस्त्यातच फेरीवाल्यांच्या हातगाड्या मोठ्या संख्येने लागत आहेत. सदर फेरीवाल्यां कडे तसेच लगतच्या खुल्या बाजारात खरेदीसाठी येणाराया लोकांची वाहनं हातगाड्यां पुढे लागत आहेत. परिणामी आधीच मेट्रो कामा मुळे अरुंद झालेल्या या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.पोलीस चौकी जवळच असली तरी पोलीस देखील काणाडोळा करत असुन दुसरीकडे महापालिकेने फेरीवाल्यांना हटवण्यासाठी नेमलेला ठेकेदार देखील कुचकामी ठरला असुन त्याच्या सह पालिकेचे संगनमत असल्याचा आरोप नागरीकां मधुन होत आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेMira Bhayanderमीरा-भाईंदर