शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

सभागृहानेच अविश्वास ठराव करुन मला शासनाकडे पाठवावे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे भावनिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 4:37 PM

शासन माझी बदली करीत नाही, त्यामुळे सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वासाचा ठराव करावा असे भावनिक आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले.

ठळक मुद्देअप्रत्यक्षरित्या भाजपाला लगावला टोलाबदली झाली नाही तर सुट्टीवर जाणार

ठाणे - ज्यांनी माझा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी काल पर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झिरो केले आहे. माझ्यावर वयक्तीक टिका करुन माझ्या बदलीसाठी प्रयत्न केले जात असल्याचा अप्रत्यक्ष टोला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाजपाला लगावला. परंतु मलाच इथे राहण्याची अजिबात इच्छा नाही, शासन देखील माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे. आई शप्पथ या ठरावाला मी कोणताही विरोध करणार नसल्याचे भावनिक आवाहन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. परंतु एप्रिल पर्यंत बदली झाली नाही तर मी सुट्टीवर जाईन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.                   मंगळवारी महासभा सुरु होताच, मुंब्रा स्टेडीयमचा मुद्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चांगलेच वातावरण तापले होते. तसेच याच महासभेत भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी पोलिसांना बाईक देण्याच्या प्रकरणावरुन सभा तहकुबी मांडली होती. त्यामुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी चिंतेत होते. त्यात मुंब्य्राच्या स्टेडीअमवर सुरु असलेल्या वादाच्या वेळेस देखील भाजपाच्या नगरसेवकाने प्रशासनाने मोबाईलवर वाचलेल्या पत्रावर आक्षेप घेतल्याने आयुक्त संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी बदलीसाठी भावनिक आवाहन केले. स्थायी समिती नसल्याने ३५ (अ) नुसार प्रशासकीय वित्तीय मान्यतेचे विषय हे महासभेच्या पटलावर येत असतात. त्यामुळेच महासभेत विषय वाढले जात आहेत. परंतु, त्यातही काही घटक प्रशासनावर बोट ठेवत आहेत हे चुकीचे आहे. तीन वर्षे मी माझे घरदार विसरुन शहराचा विकास व्हावा यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले. परंतु आॅक्टोबर महिन्यात माझ्यावर ज्या पध्दतीने वयक्तीक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच मी व्यतीथ होतो. त्यामुळे माझी बदली व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत होतो. परंतु माझी बदली झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काही घटकांनी माझ्या विरोधात वातावरण तयार करुन मला बदनाम करण्याचे कारस्थानही रचले. काहींनी तर माझी बदली व्हावी यासाठी प्रयत्न देखील केले. तीन वर्षात ज्या घटकांनी माझा वापर ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडेर म्हणून केला, ज्यांनी मला हिरो ठरविले. त्याच लोकांनी माझ्यावर वयक्तीक टिका करुन एका क्षणात झिरो ठरविल्याचा अप्रत्यक्ष टीका त्यांनी भाजपावर केली. मला हुकमशहा, औरंगजेब अशी देखील माझ्यावर टिका झाली. मी संवेदनशील असल्याने मला याचे दुख होत आहे. माझी इमेज डाऊन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मला त्याचे सर्वात जास्त दुख होत असल्याचेही त्यांनी सांगितले. भांडणे कोणाची नाही होत, माझे देखील सभागृहातील सदस्यांबरोबर कित्येक वेळेला भांडण झाले आहे. परंतु मी कधीही ते वयक्तीक पातळीवर नेले नाही. परंतु माझ्या विरोधात काही घटक अशा पध्दतीने कृत्य करीत असले तरी जनतेच्या मनात माझे रिपोर्ट कार्ड तयार आहे. त्यामुळे मला टिकेची मुळीच चिंता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुळात मलाच येथे राहयाचे नाही, त्यासाठी आजपासूनच मी सुट्टीवर जाणार होतो. परंतु रात्री मला एकाने आश्वासन दिल्याने मी सुट्टी रद्द केली आहे. परंतु एप्रिल पर्यंत माझी बदली झाली नाही, तर मात्र जो पर्यंत माझ्या बदलीची आॅर्डर येत नाही, तो पर्यंत मी सुट्टीवर जाईन असा इशाराही त्यांनी दिला. शासन माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठरुन करुन मला शासनाकडे पाठवावे, आई शप्पथ जे असा ठराव करतील त्यांचे मी मनापासून आभार मानने असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त