शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये स्थापला आपत्कालीन कक्ष

By admin | Updated: May 27, 2017 02:10 IST

२७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाचे कार्यालय दावडी परिसरातील रिजन्सी गार्डनमधील प्रशस्त अशा जागेत उभारण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : २७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाचे कार्यालय दावडी परिसरातील रिजन्सी गार्डनमधील प्रशस्त अशा जागेत उभारण्यात आले आहे. परंतु, लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या कार्यालयात मात्र आपत्कालीन कक्षासाठी जागा नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अखेर, जागेअभावी हा कक्ष अत्यंत छोट्या अशा सुरक्षा विभागाच्या केबिनमध्ये थाटण्याची नामुश्की येथील प्रशासनावर ओढवली आहे. आधीच केबिन सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीची ठरत असताना त्यात आता आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.१२ फेब्रुवारीला ई प्रभाग कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु, ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. स्थानिक रहिवासी असलेल्या विश्वनाथ पटवर्धन यांनी या अतिक्रमणाची मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सोसायटीच्या वतीने महापौर राजेंद्र देवळेकर आणि तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. दरम्यान, लाखो रुपये खर्चून हायटेक स्वरूपात बांधण्यात आलेल्या या प्रभाग कार्यालयात आपत्कालीन कक्षासाठी एखादे दालन नसणे, ही शरमेची बाब ठरली आहे. पावसाळ्याच्या धर्तीवर महापालिकेच्या सर्वच प्रभाग कार्यालयांमध्ये आपत्कालीन कक्ष उभारण्यात आले आहेत. इतरत्र या कक्षांची स्थिती फारशी आलबेल आहे, असेही नाही. परंतु, प्रशस्त अशा ई प्रभाग कार्यालयात चार बाय पाच आकाराच्या सुरक्षा केबिनमध्ये थाटण्यात आलेला आपत्कालीन कक्ष हा चर्चेचा विषय ठरला आहे. या केबिनमध्ये जेमतेम एखादा सुरक्षारक्षक बसेल, इतकीच जागा आहे. त्यात आता या कक्षाची भर पडल्याने आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांंबरोबरच सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होणार आहे. आपत्कालीन सेवेसाठी तीन पाळ्यांत प्रत्येकी पाच कर्मचारी देण्यात आले आहेत.