शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

‘अमृत’ मिशन फाइलबंद!

By admin | Updated: April 24, 2017 02:24 IST

केंद्र शासनाने एएमआरयुटी म्हणजे ‘अमृत मिशन’ प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी लागू केला. त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांनी पाणीपुरवठा

सुरेश लोखंडे / ठाणे केंद्र शासनाने एएमआरयुटी म्हणजे ‘अमृत मिशन’ प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी लागू केला. त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांनी पाणीपुरवठा, मल:निस्सारण, नागरी वाहतूक, उद्यान विकास आदी सुमारे तीन हजार ३१२ कोटींचे प्रकल्प प्रस्तावित केले. पण हे प्रकल्प अद्याप केवळ फाईलमध्येच आहेत. या प्रकल्पांचे काम युध्दपातळीवर सुरू होणे अपेक्षित असतानाही त्याला गती मिळालेली नाही. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अमृत मिशन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महापालिका, कुळगांव-बदलापूर नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरण (एमजेपी) यांनी तीन हजार ३३१२ कोटी २६ लाख रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव दिले. यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करून ते पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु या यंत्रणांकडून त्यासाठी फारशा हालचालीच होत नसल्याची बाब दिशा समितीच्या निदर्शनास आली आहे.त्यामुळेच या प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या हालचाली समितीने सुरू केल्या आहेत. या अमृत मिशनमध्ये देशातील मोजक्याच ५०० शहरांचा समावेश आहे. त्यात राज्यातील ४३ शहरे आहेत. ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका, एक नगरपालिका आणि एमजेपीचा त्यात समावेश आहे. अमृत मिशनव्दारे ठाणे महापालिकेने एक हजार ६६९ कोटीं रूपये खर्चाचे तीन प्रकल्प प्रस्तावित केल. त्यात सर्वाधिक एक हजार ३८ कोटीं खर्चाचा पाणीपुरवठा, तर ६३० कोटींचा मलनि:स्सारण प्रकल्प आणि एक कोटीचे उद्यान आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ८९७ कोटीचे पाच प्रकल्प हाती घेतलेले आहेत. यामध्ये २७ गावांच्या पाणी पुरवठ्यासह ३३ जलकुंभ बांधले जाणार आहेत. यावर ३९९ कोटीं खर्च होणार आहे, तर १३४ कोटींच्या मलनि:स्सारण प्रकल्पाचा समावेश आहे. कल्याणच्या सहा सेक्टरसह डोंबिवलीतील चार आणि टिटवाळ्यातील दोन सेक्टरमध्ये मलनि:स्सारणाची ही योजना राबविली जाणार आहे. अस्तित्वातील मलनि:स्सारण योजनांच्या दुरूस्तीवर २२२ कोटी खर्च होणार आहे. शहाड ते टिटवाळादरम्यान मोहने, मोहिली व बल्याणी भागातील सध्याच्या मलनि:स्सारणावर १४२ कोटी खर्चाचे नियोजन आहे. या प्रकल्पांसह डोंबिवलीच्या एकतानगर, आयरे येथे उद्यान विकास, तसेच कल्याणच्या तेजपालनगरमध्ये देखील तीन बगीचे विकसित होणार आहेत. नवी मुंबई महापालिकेचा सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प आहे. भिवंडी महापालिकेने २९३ कोटी १३ लाख रूपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे, तर एक कोटी ३६ लाखांचा हरित क्षेत्र विकास, हाळा तलाव व काटई डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लागवडीचा प्रकल्प आहे. कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेने ३३७ कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प सादर केला आहे. एमजेपीने पूरक अंबरनाथ पाणीपुरवठा प्रकल्पाच्या ५१ कोटी ६७ लाखांच्या, तर कुळगांव - बदलापूर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या ६२ कोटी ६८ लाखांच्या खर्चास तांत्रिक मंजुरी घेतल्याचे आढळून आले आहे.