शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तानाजी चित्रपटातील बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह भाग वगळण्यासाठी नाभिक समाजाचा एल्गार

By जितेंद्र कालेकर | Updated: January 23, 2020 22:50 IST

‘तानाजी’ चित्रपटामध्ये नाभिक समाजातील ‘चुलत्या’ हा उदयभानकडे चहाडया करतो, असे दर्शविण्यात आले आहे. या विकृत चित्रणातून नाभिक समाजाची बदनामी होत असून ही दृश्य चित्रपटातून तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रीय जनसेवा पक्षाने केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय जनसेवा पक्षाद्वारे नाभिक समाज काळया फिती लावून सरकारचा निषेध नोंदविणारमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ‘तानाजी’ या हिंदी चित्रपटामध्ये चुलत्या च्या पात्राद्वारे चहाडखोर असे चित्रण नाभिक समाजाचे दाखविण्यात आले आहे. या विकृत चित्रणातून नाभिक समाजाची बदनामी होत असून ही दृश्य चित्रपटातून तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रीय जनसेवा पक्षाने केली आहे. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी काळया फिती लावून २५ जानेवारी रोजी नाभिक समाजाच्या वतीने राज्यभर निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे अध्यक्ष महावीर गाडेकर आणि संपर्कप्रमुख संजय पंडित यांनी दिली.‘तानाजी’ चित्रपटामध्ये नाभिक समाजातील ‘चुलत्या’ हा उदयभानकडे चहाडया करतो, असे दर्शविण्यात आले आहे. या बदनामीविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारचा अवमान नाभिक समाज कदापि सहन करणार नाही, असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे. यासोबतच समाजाच्या इतरही प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे संरक्षण मिळावे, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे, गटई कामगार धर्तीवर सलून व्यवसायिकाना टपरी योजना मंजूर व्हावी, असंघिटत कामगार योजने अंतर्गत शासनाच्या सर्व सवलती मिळाव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे प्रतापगडावर भूमीपूजन करावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष गाडेकर यांच्यासह संजय पंडित, सचिव रमेश राऊत, सहसचिव गणेश क्षीरसागर आणि उपसंघटक सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिक