शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात वीज मीटर रीडिंगच्या कंत्राटांची खिरापत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:42 IST

वीज मीटर रीडिंगसाठी कमी दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला नियमाप्रमाणे काम देणे अपेक्षित असताना एकच काम निविदा भरलेल्या पाच ते सहा ठेकेदारांना दिल्याचा प्रकार ‘महावितरण’च्या वाशी डिव्हीजनमध्ये घडल्याची बाब उघड झाली आहे.

ठाणे  - वीज मीटर रीडिंगसाठी कमी दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला नियमाप्रमाणे काम देणे अपेक्षित असताना एकच काम निविदा भरलेल्या पाच ते सहा ठेकेदारांना दिल्याचा प्रकार ‘महावितरण’च्या वाशी डिव्हीजनमध्ये घडल्याची बाब उघड झाली आहे. त्याबाबत महावितरणाच्या मुंबईतील मुख्य चौकशी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल झाली आहे.दुसरीकडे आपल्या जवळच्या आणि मर्जीतील ठेकेदारांना काम मिळावे म्हणून एका कंत्राटदाराची निविदा कोणतेही कारण न देता ठाणे-२ सबडिव्हिजनमध्ये डावलल्याची तक्रार भांडुप नागरी परिमंडळातही दाखल झाली आहे. निविदा मंजूर करताना महावितरणच्याच काही अधिकाºयांनी ही क्लृप्ती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.महावितरणच्या माध्यमातून मीटर फोटो रीडिंग, बिल प्रिटिंग आदींसह पाच कामांची मिळून वाशी, कोपरखैरणे, ऐरोली या भागांची १ कोटींची निविदा काढली होती.ई टेंडरिंगद्वारे ही निविदा प्रक्रियापार पडली होती. त्यामुळेनियमानुसार कमी दराची निविदा भरलेल्या कंत्राटदाराला काम देणे अपेक्षित होते.परंतु या नियमाला हरताळ फासण्याचा प्रकार काही अधिकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ज्या ठेकेदाराला ऐरोलीचे काम दिले गेले त्याला ते काम संपूर्ण न देता, विभागून देण्यात आले. तर वाशीचे कामही त्यानेच करावे, असा हट्ट केला गेला.वास्तविक त्याने ज्या ठिकाणी कामाचे टेंडर भरले असेल त्या ठिकाणचेच काम तो करू शकतो, परंतु टक्केवारीच्या हव्यासापोटी हा अट्टाहास केला गेला.एका ठेकेदाराला काम देण्यापेक्षा तेच काम निविदा भरलेल्या चार ते पाच जणांत विभागून दिले तर प्रत्येकाकडून टक्केवारीचा लाभ होऊ शकतो, असा महावितरणच्या काही भ्रष्ट अधिकाºयांचा प्रयास असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तीन महिन्यांनी वर्क आॅर्डरउपरोक्त कामाची निविदा प्रक्रिया एप्रिलमध्ये पूर्ण झाल्यानंतर तत्काळ वर्कआॅर्डर देणे अपेक्षित होते. परंतु तीन महिन्यांनंतर वर्कआॅर्डंर देण्यात आली.कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरही निविदा बादठाणे २ या सबडिव्हिजनमध्ये वीज मीटर रीडिंग कामाची निविदा काढण्यात आली होती. आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे या उद्देशाने ज्या ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केली होती आणि ज्याने सर्वात कमी दराची निविदा भरली होती, त्यालाच कागदपत्रांची योग्य वेळेत पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत बाद करण्यात आले.चौकशी करून दोषींवर कारवाई करूनिविदांमधील घोटाळ््याबाबत तक्रारीचे पत्र आले आहे का, याची प्रथम तपासणी केली जाईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानुसार पुढील पावले उचलली जातील.- पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंत्या, भांडुप नागरी परिमंडळ

टॅग्स :electricityवीजnewsबातम्या